मोदी सरकारने मुसलमानांसोबतच्या भेदभावाची चुक सुधारावी - उपराष्ट्रपती

By admin | Published: September 1, 2015 09:50 AM2015-09-01T09:50:58+5:302015-09-01T10:27:45+5:30

केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम समाजासोबतच्या भेदभावाची चुक सुधारावी असे विधान उप राष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले आहे.

Modi government should improve the wrongdoing of Muslims - Vice President | मोदी सरकारने मुसलमानांसोबतच्या भेदभावाची चुक सुधारावी - उपराष्ट्रपती

मोदी सरकारने मुसलमानांसोबतच्या भेदभावाची चुक सुधारावी - उपराष्ट्रपती

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - भारतीय मुसलमानांना स्वत:ची ओळख, सुरक्षा, शिक्षण व सशक्तीकरण करण्यात अपयश येत असून केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम समाजासोबतच्या भेदभावाची चुक सुधारावी असे विधान उप राष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले आहे. 

मुस्लिम संघटनांची शिखर संघटना असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए मुशावरत या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हमीद अन्सारी यांनी मुस्लिमांच्या समस्यांवर भाष्य केले. मुसलमानांना भेडसावणा-या समस्या सरकारने गंभीरतेने घेण्याची गरज असून या समस्या सोडवण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने सबका साथ सबका विकासच्या धर्तीव मुस्लिमांची ओळख व सुरक्षा मजबूत करण्यावर भर द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे. सक्षमीकरण, राजकीय व निर्णय प्रक्रियेत समान वाटा मिळणे हा मुस्लिमांचा हक्क असून यासाठी सरकारने नवीन धोरण व कार्यपद्धतीचा विकास करावा अशी मागणीही त्यांनी कली.  

Web Title: Modi government should improve the wrongdoing of Muslims - Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.