होऊ दे खर्च... मोदी सरकारने योजनांच्या प्रचारासाठी वापरले 5,245 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 17:16 IST2018-12-28T17:07:51+5:302018-12-28T17:16:22+5:30
सत्ताधारी भाजपाकडून विकासकामांपेक्षा त्यावरील प्रचारावर अधिक खर्च होतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांच्या प्रचारावर किती प्रमाणात खर्च करण्यात आला?, याची माहिती समोर आली आहे.

होऊ दे खर्च... मोदी सरकारने योजनांच्या प्रचारासाठी वापरले 5,245 कोटी
नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपाकडून विकासकामांपेक्षा त्यावरील प्रचारावर अधिक खर्च होतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांच्या प्रचारावर किती प्रमाणात खर्च करण्यात आला?, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत सांगितले की, 2014 पासून ते 7 डिसेंबर 2018 या कालावधीदरम्यान सरकारी योजनांच्या प्रचारावर एकूण 5,245.73 कोटी रुपये खर्च करण्यात आला.
या मुद्यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना राठोड यांनी म्हटलं की, 'विविध मंत्रालय तसंच विभागांकडून चालवण्यात येणाऱ्या योजनांविषयी लाभार्थ्यांमध्ये प्रचार तसंच त्याविषयाची माहिती पुरवणे, हे शिक्षण आणि संवादाचे घटक असते. यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत ब्युरो ऑफ आउटरीच अँड कम्युनिकेशनतर्फे माहिती आणि शिक्षणाचे अभियान राबवले जाते. हे अभियान लाभार्थी आणि आर्थिक निधीची उपलब्धता इत्यादी मुद्यावर ठरवले जाते.
(जाहिरातीबाजीवर मोदी सरकारने खर्च केले 4343 कोटी)
ब्युरो ऑफ आउटरीच अँड कम्युनिकेशननं 2014पासून वेगवेगळी मंत्रालये तसंच विभागांतर्फे विविध प्रसार माध्यमाद्वारे माहिती आणि शिक्षण मोहिमांवर एकूण रक्कम खर्च केली आहे.