मोदी सरकारने जाहीरात, प्रसिद्धीवर खर्च केले 992.46 कोटी
By admin | Published: February 10, 2017 09:35 AM2017-02-10T09:35:59+5:302017-02-10T09:43:08+5:30
चालू आर्थिकवर्षात केंद्र सरकारने जाहीरात आणि प्रसिद्धीवर 992.46 कोटी रुपये खर्च केले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - चालू आर्थिकवर्षात केंद्र सरकारने जाहीरात आणि प्रसिद्धीवर 992.46 कोटी रुपये खर्च केले आहेत. जाहीरात आणि दृश्य प्रसिद्धी संचालनालयातर्फे (डीएव्हीपी) हा खर्च करण्यात आला. 31 जानेवारी 2017 पर्यंत विविध माध्यमांमध्ये जाहीरातींवर सरकारने 992.46 कोटी रुपये खर्च केले आहेत असे माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राज्यसभेत लिखित उत्तरामध्ये सांगितले.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील जाहीरातींवर हा खर्च करण्यात आला. डीएव्हीपी ही भारत सरकारची केंद्रीय संस्था असून, विविध मंत्रालये, खाती, पीएसयू यांच्यावतीने डीएव्हीपी जाहीरात आणि प्रसिद्धीचे काम पाहते. 992.46 कोटी रुपयांपैकी 545.60 कोटी प्रिंट मीडियामधील जाहीरातींवर खर्च करण्यात आले. 340.52 कोटी इलेक्ट्रॉनिक मीडियावर खर्च झाले. अन्य माध्यमातून जाहीरातींवर 92 कोटी रुपये खर्च झाले.
2015-16 मध्ये सरकारने 1190.53 कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केले होते. त्यातील 510 कोटी प्रिंट आणि 531.60 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक मीडियामधील जाहीरातींवर खर्च करण्यात आले.