चित्रपटगृहांमध्ये मोदी सरकारचा होणार प्रचार

By admin | Published: April 26, 2016 05:57 AM2016-04-26T05:57:26+5:302016-04-26T05:57:26+5:30

चित्रपटगृहांत तुम्ही यापुढे चित्रपट पाहायला गेलात तर तो सुरू होण्याआधी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची यशोगाथा तुम्हाला पाहावी लागणार आहे.

Modi government will be promoting theater in theaters | चित्रपटगृहांमध्ये मोदी सरकारचा होणार प्रचार

चित्रपटगृहांमध्ये मोदी सरकारचा होणार प्रचार

Next

नवी दिल्ली : चित्रपटगृहांत तुम्ही यापुढे चित्रपट पाहायला गेलात तर तो सुरू होण्याआधी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची यशोगाथा तुम्हाला पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिगटानेच प्रत्येक चित्रपटगृहामध्ये केंद्र सरकारच्या यशोगाथेची डॉक्युमेंटरी दाखवण्याची शिफारस केली आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजनांना पंतप्रधानांचे वा राष्ट्रीय पुरुषांचे नाव देण्यात यावे, असेही सुचवण्यात आले आहे. सध्या पंतप्रधानांच्या वा राष्ट्रपुरुषांच्या नावानेच बहुतांशी योजना राबवण्यात येतात. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने त्यात नेमका काय बदल करण्याचे सुचवले आहे, ते समजू शकले नाही.
याखेरीज केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे उद्घाटन यापुढे केंद्रीय मंत्री आणि खासदार यांच्या उपस्थितीतच केले जावे, तरच त्या योजना केंद्राच्या आहेत, हे जनतेच्या लक्षात येईल, असे मंत्रिगटाचे म्हणणे आहे.

Web Title: Modi government will be promoting theater in theaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.