सोलर रूफ टॉप योजने संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, एक कोटी कुटुंबांना मिळेल मोफत वीज, होईल बंपर कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 05:12 PM2024-02-29T17:12:52+5:302024-02-29T17:14:10+5:30
सोलर प्लांटमधून जी अतिरिक्त वीज निर्माण होईल, ती वीज कंपन्यांना विकूण लोकांना पैसाही कमावता येईल...
केंद्रातील मोदी सरकारने रूफटॉप सोलार स्कीमसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेचा फायदा देशभरातील तब्बल एक कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी यासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एक कुटुंबांना दर महा 300 युनिट मोफत वीज मिळू शकेल.' या योजनेंतर्गत प्रति एक किलो वॅट सिस्टिमवर प्रत्येक कुटुंबाला 30 हजार रुपयांची सब्सिडी मिळेल. याशिवाय 2 किलोवॅट सिस्टिमअंतर्गत 60 हजार रुपयांची सब्सिडी मिळेल.
या योजनेंतर्गत, कोणतेही कुटुंब नॅशनल पोर्टलला भेट देऊन अनुदानासाठी अर्ज करू शकते आणि रूफटॉप सोलर स्कीमसाठी कुठल्याही विक्रेत्याची निवडू करू शकतात. याशिवाय त्यांना कमी व्याजाने कर्जही मिळू शकते. याच बरोबर, सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर योजना बनवण्याचा निर्णयही घेतला आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी या गावांना रोल मॉडेल म्हणून तयार करण्यात येणार आहे. आसंदर्भात अर्थसंकल्पातही घोषणा करण्यात आली होती.
असा होईल फायदा -
1. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळेल. यामुळे वीजबिलाची बचत होऊन महिन्याला हजारो रुपयांची बचत होईल.
2. सोलर प्लांटमधून जी अतिरिक्त वीज निर्माण होईल, ती वीज कंपन्यांना विकूण लोकांना पैसाही कमावता येईल.
3. रहिवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून 30 GW वीजही तयार होईल.
4. यामुळे कार्बन उत्सर्जनातही पुढील 25 वर्षांत 720 मिलियन टन पर्यंतची घट होईल.
5. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांच्या माध्यमातून 17 लाख एवढा रोजगार तयार होईल.