आणीबाणीतील बंदींना मोदी सरकारचीहीे पेन्शन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 06:26 AM2018-06-17T06:26:24+5:302018-06-17T06:26:24+5:30
रा. स्व. संघात उत्साह आणण्यासाठी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे. संघाच्या १ लाख कार्यकर्त्यांना या पेन्शनचा लाभ होईल.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : रा. स्व. संघात उत्साह आणण्यासाठी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार मोदी सरकार करीत आहे. संघाच्या १ लाख कार्यकर्त्यांना या पेन्शनचा लाभ होईल. आणीबाणीत मिसा व डीआरआय कायद्याखाली अनेकांची धरपकड झाली. त्यांना पेन्शन देण्याच्या मोदी सरकारचा विचार आहे. सूरजकुंड येथे संघ व भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आणीबाणी पेन्शनचा मुद्दा चर्चिला गेला. त्यांना पेन्शन दिल्यास २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपाला मोठे बळ मिळू शकते, असा विचार या बैठकीत मांडला.
>विरोधी ऐक्यावर झाली चर्चा
विरोधी पक्षांच्या ऐक्याशी कसा सामना करायचा, यावरही बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ व भाजपा नेत्यांसाठी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. विरोधकांचे ऐक्य फार टिकणार नाही, कर्नाटकातील सरकारही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी या नेत्यांना
सांगितले.