मोदी सरकारने भारताची जमीन चीनला देऊन टाकली?, ओवैसींचा पंतप्रधानांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:29 PM2020-09-11T12:29:39+5:302020-09-11T12:35:35+5:30
परराष्ट्रमंत्र्यांनी एप्रिलपूर्वीच्या स्थितीत चीनला येण्यास का नाही सांगितले?, असा सवालही ओवैसी यांनी विचारला आहे.
नवी दिल्लीः भारत-चीन सीमा वादावरून दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये भेट झाली आहे. त्यानंतरसंयुक्त निवेदनही काढण्यात आलं. त्यावरूनच आता एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर हल्ला केला आहे. तणावाबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे समकक्ष वांग यी यांच्यात गुरुवारी मॉस्को येथे चर्चा झाली. या चर्चेत तणाव कमी करण्यासाठी पाच-कलमी योजनेवर सहमती दर्शविली गेली आहे. ओवैसी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाले, मोदी सरकारने 1000 चौरस किलोमीटर जागेचा भारताचा हक्क समर्पित केला आहे का?, परराष्ट्रमंत्र्यांनी एप्रिलपूर्वीच्या स्थितीत चीनला येण्यास का नाही सांगितले?, असा सवालही ओवैसी यांनी विचारला आहे.
ओवैसी ट्विटमध्ये लिहितात, "परराष्ट्र मंत्र्यांचे संयुक्त विधान आम्ही पाहिले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एप्रिलपूर्वी चीनला लडाखमधील LACच्या स्थितीवर येण्याबद्दल का विचारले नाही किंवा परराष्ट्रमंत्रीही आपले बॉस पीएमओ इंडियाशी सहमत आहेत की आमच्या भागात कोणताही चिनी सैनिक आला नाही.
आपल्या पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मोदी सरकारने भारताच्या 1000 चौरस किलोमीटर जागेचा हक्क समर्पित केला आहे का?, सीमेवर ताणतणावाच्या स्थितीत चीनला गुंतवणूक, मुत्सद्दीपणा आणि इतर सर्व गोष्टी हव्या आहेत. यावर भारताने सहमत होऊ नये, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.Has the Modi Government surrendered India’s right to
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 11, 2020
1000 sq km of land ?
China wishes border aggression can go on while investments,diplomacy & all else continues .India shouldn’t agree to this
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी आणि सैन्य हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत आणि चीनमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील नेत्यांनी सर्वसहमतीच्यामाध्यमातून काम केले पाहिजे. तसेच परस्परांमधील मतभेदांना विवादाचे रूप देता कामा नये, या मुद्द्यावर सहमती व्यक्त केली आहे.We have seen the joint statement of the foreign ministers. Why has @DrSJaishankar not asked for a return to the status quo ante as of April, on the LAC in Ladakh? Or does he agree with his boss, the @PMOIndia that no Chinese soldier is on our side of the LAC? https://t.co/hI97LgjN7q
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 11, 2020
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सबसिडी
पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे
…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा
कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता