Qutub Minar Ganesh Idols: कुतूब मिनारमधील दोन गणेशमूर्ती हलवणार! मोदी सरकारच्या हालचालींना वेग; नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 12:42 PM2022-04-07T12:42:54+5:302022-04-07T12:44:02+5:30

Qutub Minar Ganesh Idols: कुतूब मिनार परिसरात असणाऱ्या या गणेशमूर्तींना अनुक्रमे 'उल्टा गणेश', 'पिंजरे मे गणेश'अशा नावांनी संबोधले जाते.

modi govt to shift lord ganesh idols in qutub minar after bjp leader tarun vijay letter | Qutub Minar Ganesh Idols: कुतूब मिनारमधील दोन गणेशमूर्ती हलवणार! मोदी सरकारच्या हालचालींना वेग; नेमके कारण काय?

Qutub Minar Ganesh Idols: कुतूब मिनारमधील दोन गणेशमूर्ती हलवणार! मोदी सरकारच्या हालचालींना वेग; नेमके कारण काय?

googlenewsNext

नवी दिल्ली: कुतूब मिनारमध्ये असलेल्या दोन प्राचीन गणेशमूर्ती हलवण्याबाबत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA) भारतीय पुरातत्व खात्याला पत्र पाठवले आहे. या गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी केली आहे. यानंतर आता मोदी सरकारकडून हालचालींना वेग आला असून, जागतिक वारसास्थळ असलेल्या दिल्लीच्या कुतूब मिनारमध्ये (Qutub Minar) गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या दोन गणेशमूर्ती लवकरच इतरत्र स्थलांतरित केल्या जाण्याची शक्यता आहे.

बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनारची निर्मिती केली. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांना अंशत: नष्ट करून तेथे नवी वास्तू उभारल्याचा इतिहास आहे. त्याच ठिकाणी तेव्हापासून या दोन गणेशमूर्ती आहेत. येथील मंदिरांमध्ये पूजा करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात या ठिकाणी मूर्ती ठेवणे हे अवमानकारक असल्याचे प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. याप्रकरणी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

मशिदीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांच्या पायाजवळ मूर्ती

भाजप नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार असलेले राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी असे पत्र पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘मी या ठिकाणाला अनेकदा भेट दिली असून, तेथे मूर्ती ठेवल्या जाणे हे त्या मूर्तीबाबत अवमानकारक असल्याचे मला जाणवले. या मूर्तीची जागा मशिदीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांच्या पायाजवळ येते’, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. आता पुरातत्व खाते यासंदर्भात कार्यवाही करणार का, हे पाहावे लागेल. तसेच अनेक दशकांपासून कुतूब मिनारमध्ये असलेल्या या गणेशमूर्ती हटवण्यात आल्यास त्याचे काही पडसाद उमटणार का, याकडेही साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, युनोस्कोने १९९३ साली कुतूब मिनारला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देऊ केला होता. कुतूब मिनार परिसरात असणाऱ्या या गणेशमूर्तींना अनुक्रमे 'उल्टा गणेश', 'पिंजरे मे गणेश'अशा नावांनी संबोधले जाते. यापैकी एक मूर्ती कुव्वत उल इस्लाम मशिदीच्या दक्षिणेच्या भिंतीवर आहे. तर 'पिंजरे मे गणेश' हे मूर्ती याच मशिदीचा भाग असून जमिनीला अगदी लागून आहे. त्यामुळे लोक जेव्हा मशिदीत प्रवेश करतात तेव्हा ही मूर्ती अगदी त्यांच्या पायाजवळ असते. याच गोष्टीवर राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या प्रमुखांनी आक्षेप घेतला आहे. 
 

Web Title: modi govt to shift lord ganesh idols in qutub minar after bjp leader tarun vijay letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.