मोदी यांची दरमहा सरासरी १९ भाषणे, आतापर्यंत मोदी यांनी तब्बल ७७५ सभांमध्ये केली भाषणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:21 AM2017-10-25T04:21:58+5:302017-10-25T04:22:05+5:30

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून दरमहा सरासरी १९ भाषणे केली आहेत. मोदी यांनी २६ मे २0१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत मोदी यांनी तब्बल ७७५ सभांमध्ये भाषणे केली.

Modi has an average of 19 speeches per month, so far Modi has talked about 775 meetings | मोदी यांची दरमहा सरासरी १९ भाषणे, आतापर्यंत मोदी यांनी तब्बल ७७५ सभांमध्ये केली भाषणे

मोदी यांची दरमहा सरासरी १९ भाषणे, आतापर्यंत मोदी यांनी तब्बल ७७५ सभांमध्ये केली भाषणे

Next

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून दरमहा सरासरी १९ भाषणे केली आहेत. मोदी यांनी २६ मे २0१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून आतापर्यंत मोदी यांनी तब्बल ७७५ सभांमध्ये भाषणे केली.
मोदी दर महिन्याला किमान १७ भाषणे करतात आणि ती अर्ध्या तासाहून अधिक वेळेची असतात. काही महिन्यांत त्यांनी त्याहून अधिक भाषणे केल्यामुळे ती सरासरी १९ झाली आहे. त्यांनी २0१५ साली सर्वाधिक म्हणजे २६४ भाषणे केली. त्या वर्षी त्यांनी सर्वात जास्त परदेश दौरे केले आणि परदेशांमध्येही भाषणे केली. मोदी यांनी परदेशांमध्ये केलेल्या भाषणांची संख्या १६४ आहे.
याउलट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या १0 वर्षांच्या कार्यकाळात १४0१ भाषणे केली. म्हणजेच दरमहा त्यांची भाषणे होती सरासरी ११ मोदी यांनी पाच वर्षांचा काळ अद्याप पूर्ण केला नसूनही, त्यांच्या सभा व भाषणांची संख्या अधिक आहे. त्यांनी अनेकदा एके दिवशी दोन वा तीन सभांमध्येही भाषणे केली आहेत.

Web Title: Modi has an average of 19 speeches per month, so far Modi has talked about 775 meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.