18 वर्षावरील तरुणांना मोदींनी दिला हा संदेश

By admin | Published: January 25, 2017 12:37 PM2017-01-25T12:37:01+5:302017-01-25T13:59:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना ट्विटरद्वारे संदेश दिला आहे. भारतामध्ये 25 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो

Modi has given message to young people of the age group of 18 years | 18 वर्षावरील तरुणांना मोदींनी दिला हा संदेश

18 वर्षावरील तरुणांना मोदींनी दिला हा संदेश

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना ट्विटरद्वारे संदेश दिला आहे. भारतामध्ये 25 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या तरुणांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांनी आपले नाव मतदार यादीत सामाविष्ट करण्याचे अावाहन केले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदार यादीत नाव सामाविष्ट करण्याचे आणि मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आग्रह केला आहे. 'निवडणुका या लोकशाहीला बळकटी देतात, लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. आपल्या इच्छेप्रमाणे उमेदवार निवडण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिला आहे. यामध्ये आपल्याला योग्य उमेदवार निवडण्याचे स्वतंत्र आहे', असे यावेळी मोदींनी सांगितले.  
 
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मोदी यांनी उत्तर प्रदेशसह अन्य पाच राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुका लक्षात ठेऊन मतदात्यांना मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.  त्याचप्रमाणे 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी आपले नाव निवडणूक यादीत समाविष्ट करावे, असेही ते म्हणाले आहेत. 
 
 

Web Title: Modi has given message to young people of the age group of 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.