गदारोळाला कंटाळून मोदींनी लोकसभा सोडली
By admin | Published: December 2, 2015 05:08 PM2015-12-02T17:08:49+5:302015-12-02T17:08:49+5:30
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी बुधवारी लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ केला. या गदारोळाला कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.
Next
ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी बुधवारी लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ केला. या गदारोळाला कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.
दलितांच्या विरोधात वक्तव्य करणा-या व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले होते. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वारंवार विरोधकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पण विरोधक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
४० मिनिट हा गोंधळ सुरु होता. गदारोळात सत्ताधारी पक्षाने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ सुरु राहिल्याने अखेर पंतप्रधान मोदींनी लोकसभेतून काढता पाय घेतला.