पोस्टाच्या पेमेंट बँकेचे मोदी करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 03:51 AM2018-08-06T03:51:13+5:302018-08-06T03:51:27+5:30
भारतीय टपाल विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’चे (आयपीपीबी) येत्या २१ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानीत होणाऱ्या एका कार्यक्रमात औपचारिक उद्घाटन होणार आहे.
नवी दिल्ली: भारतीय टपाल विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’चे (आयपीपीबी) येत्या २१ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानीत होणाऱ्या एका कार्यक्रमात औपचारिक उद्घाटन होणार आहे.
दळणवळण खात्याच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, या बँकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांनी २१ आॅगस्ट रोजी वेळ दिला आहे. या बँकेच्या दोन शाखा याआधीच सुरु झाल्या आहेत. राहिलेल्या ६४८ शाखा देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे सुरु करण्यात येतील. देशाच्या कानाकोप-यात १.५५ टपाल कार्यालये आहेत. त्यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील लोकांना पोस्टाच्या पमेंट बँकेमार्फत बँकिंग व वित्तीय सेवा मिळू शकतील.