मोदींनी लोकशाहीची हत्या केली - सोनिया गांधी
By admin | Published: May 6, 2016 11:28 AM2016-05-06T11:28:57+5:302016-05-06T12:34:46+5:30
मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 06 - मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाताखाली 'लोकतंत्र बचाव यात्रा'चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी ही टीका केली आहे. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मनमोहन सिंग यांनीदेखील भाषण करत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली .केंद्र सरकार लोकशाहीची हत्या करत आहेत, गरिबांकडे आणि खासकरुन शेतक-याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाताखाली 'लोकतंत्र बचाव यात्रा'चं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत जमा झाले आहेत.
मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, महागाईने जगणं महाग झालं आहे, पण मोदी सरकार डोळे झाकून बसलं आहे. तसंच मोदी सरकार विद्यार्थ्यांवरही अन्याय करतंय, त्यांना देशद्रोही ठरवतंय असं सोनिया गांधी बोलल्या आहेत. संसदेत आणि बाहेरही मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात जोमाने उभं राहू. या मोर्चानंतर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जा आणि मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेचा बुरखा पाडा असं आवाहन सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना केलं.
मोदीजी कुठे आहेत 'अच्छे दिन'? - राहुल गांधी
राहुल गांधी यांनीदेखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधत मोदीजी कुठे आहेत 'अच्छे दिन'? असा सवाल विचारला. एकीकडे देशभरात दररोज 50 शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे सरकार लोकशाहीचीही हत्या करत आहे. देशभरात फक्त मोहन भागवत आणि नरेंद्र मोदीच बोलतात. त्यांच्याविरोधात बोलणं गुन्हा ठरवलं जात आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
नेत्यांची धरपकड आणि सुटका
जंतर मंतरपासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातच मोर्चा रोखत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए के अँटोनी आणि गुलाम नबी आझाद यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन करण्यास सुरुवेत केली. संसद रोड पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली. थोड्या वेळाने पोलिसांनी सोनिया गांधींसह इतर नेत्यांची सुटका केली.