पंतप्रधान मोदींना लोकांच्या बाथरुममध्ये डोकावायला आवडते - राहुल गांधी
By admin | Published: February 11, 2017 12:52 PM2017-02-11T12:52:56+5:302017-02-11T12:52:56+5:30
10 सूत्री कार्यक्रम लखनऊमध्ये जाहीर करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेनकोट वक्तव्याचा समाचार घेतला.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - काँग्रेस-समाजवादी पक्ष आघाडीचा 10 सूत्री कार्यक्रम लखनऊमध्ये जाहीर करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेनकोट वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदींना जन्मपत्रिका वाचायला, गुगल सर्च करायला तसेच लोकांच्या बाथरुममध्ये डोकावायला आवडते.
पंतप्रधान मोदींना जे आवडते ते करुं दे, या निवडणुकीत जनताच त्यांना सणसणीत उत्तर देईल असे राहुल यांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले. पण एकही डाग त्यांच्यावर नाही. रेनकोट घालून आंघोळ करायचे कौशल्य त्यांच्याकडून शिकले पाहिजे असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये केले होते.
त्यानंतर काल हरिव्दार येथील सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी जरा जपून बोलावे, त्यांची जन्मपत्रिका माझ्याकडे आहे असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना राहुल म्हणाले की, तुम्ही दोन वर्षांपासून पंतप्रधान आहात. तुम्ही काँग्रेसची जन्मपत्रिका काढू शकता.
आज देशात बेरोजगारी आहे. मोदींनी दोन कोटी नोक-यांचे आश्वासन दिले होते. पण अजूनपर्यंत एक टक्काही आश्वासन पूर्ण झालेले नाही. मोदी सुरक्षा, सर्जिकल स्ट्राईक, दहशतवादाबद्दल बोलतात. पण मागच्या सातवर्षात मोठया प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. 90 पेक्षा जास्त सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे असे सर्जिकल स्ट्राईकचा दाखला देताना राहलु म्हणाले. उत्तरप्रदेशच्या निकालातून पंतप्रधान मोदींना धक्का बसेल आणि त्यांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे राहुल म्हणाले.