Modi in Manipur: ढम ढम बाजे ढोल... पंतप्रधान मोदींनी मणीपूरमध्ये पारंपरीक घंटाही वाजवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:11 PM2022-01-04T18:11:54+5:302022-01-04T18:13:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणीपूर दौऱ्यावर असून मणीपूरच्या जनतेसाठी 4800 हजार कोटी रुपयांच्या योजनेचं उद्घाटन मोदींच्याहस्ते करण्यात आलं आहे
मणीपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रांतिक अस्मिता जपणारे नेते आहेत. त्यामुळे, ज्या राज्यात ते सभा किंवा रॅली काढतात तेथील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यात आपलेपणा जपण्यासाठी ते संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेतं संवाद साधतात. महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, कर्नाटकात कानडी भाषेचा मोदींनी अनेकदा वापर केल्याचं आपण पाहिलं आहे. तसेच, त्या राज्यांच्या परंपराही ते जपतात. मोदींनी मणीपूर दौऱ्यात तेथील पारंपरीक वाद्य वाजवत अनेकांची मने जिंकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणीपूर दौऱ्यावर असून मणीपूरच्या जनतेसाठी 4800 हजार कोटी रुपयांच्या योजनेचं उद्घाटन मोदींच्याहस्ते करण्यात आलं आहे. संपूर्ण नॉर्थ ईस्टमधील युवक आज शस्त्रास्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. यापूर्वीच्या सरकारने पूर्वेत्तर राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदींना केला. दरम्यान, मणीपूर दौऱ्यावर आल्यानंतर मोदींचं मणीपूरच्या पारंपरीक कला आणि नृत्य संस्कृतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी, मोदींनी स्वागत करण्यासाठी वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांसमेवत स्वत:ही वाद्य वाजविण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे मोदींनी ढोल आणि पारंपरीक घंटाही वाजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi plays traditional musical instruments during his visit to Manipur pic.twitter.com/2Y4X11wV9z
— ANI (@ANI) January 4, 2022
जीमममधील व्हिडिओही व्हायरल
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान येथे असलेल्या क्रीडा संकुलात पोहोचले. येथे असलेल्या जिमला पंतप्रधानांनी भेट दिली आणि स्वत: जिममध्ये व्यायामही केला. पीएम मोदी सर्वप्रथम येथील जिममध्ये पोहोचले आणि तेथील मशीन्सचा त्यांनी आढावा घेतला. येथे त्यानी फिटनेस इक्विपमेंट Body Wait latpull machine मशीनवर एक्रसाइज केली. मोदींनी सलग 15 वेळा हे मशीन एकापाठोपाठ एक खेचले होते, त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.