मोदी-नेतन्याहू मैत्रीचा वाढला गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:22 AM2018-01-17T02:22:14+5:302018-01-17T02:22:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या मैैत्रीचा गोडवा वाढत चालला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी गळाभेट घेत याचा प्रत्यय दिला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या मैैत्रीचा गोडवा वाढत चालला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी गळाभेट घेत याचा प्रत्यय दिला.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी भारत दौºयाच्या सुरुवातीलाच मोदी यांचा उल्लेख क्रांतिकारी नेता म्हणून केला होता. दरम्यान, आज नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, माझे मित्र मोदी यांच्यासोबत योगा क्लास करण्यासाठी आपण उत्सुक
आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत नेतन्याहू यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले होते. नेतन्याहू हे बुधवारी गुजरात दौºयावर जाणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्यासोबत असणार आहेत.
मोदी आणि नेतन्याहू हे बुधवारी अहमदाबादेत दाखल होत असून, दोन्ही नेते येथे एक रोड शो करणार आहेत. विमानतळ ते साबरमती आश्रम यादरम्यान ८ कि.मी.च्या अंतरात हा रोड शो होणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोक त्यांचे स्वागत करणार आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह मंगळवारी ताजमहलला भेट दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. नेतन्याहू यांच्या ताज भेटीच्या पार्श्वभूमीवर सामान्य पर्यटकांसाठी ताजमहलचा प्रवेश दोन तास बंद होता.
समुद्राचे पाणी शुद्ध
करणारी मशीन भेट
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे मोदी यांना एक जीप भेट देणार आहेत. यामध्ये समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान आहे. ही जीप भारतात दाखल झाली आहे. आता ही जीप गुजरातमध्ये भूज येथे पाठविण्यात येणार आहे.
समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग दोन्ही देशांचे पंतप्रधान १७ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखविणार आहेत. या जीपची किंमत १,११,००० डॉलर आहे.