मोदी, पवार, जेटली घटवताहेत वजन, राजकीय वजन वाढवण्यासाठी ‘व्यायाम’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:22 AM2018-12-26T07:22:04+5:302018-12-26T07:22:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वित्तमंत्री अरुण जेटली आदी नेतेमंडळी आपले शारीरिक वजन घटविण्याच्या मागे लागली आहेत.

 Modi, Pawar, Jaitley losing weight, 'exercise' to increase political weight | मोदी, पवार, जेटली घटवताहेत वजन, राजकीय वजन वाढवण्यासाठी ‘व्यायाम’

मोदी, पवार, जेटली घटवताहेत वजन, राजकीय वजन वाढवण्यासाठी ‘व्यायाम’

Next

- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वित्तमंत्री अरुण जेटली आदी नेतेमंडळी आपले शारीरिक वजन घटविण्याच्या मागे लागली आहेत. लोकसभा निवडणुका अवघ्या १०० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात प्रत्येकाचे राजकीय वजन किती हे ठरेलच, पण त्या रणधुमाळीत आपण तंदरुस्त हवे असा या नेत्यांचा कटाक्ष आहे.
नरेंद्र मोदी यांनी प्रयत्नपूर्वक तीन किलो वजन घटविले आहे. निमलष्करी दलाच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मोदी व्यायाम करतात. त्यांची व्यायामशाळा साऊथ ब्लॉक कार्यालयात आहे. महिन्यातील १५ दिवस ते तेथे हजेरी लावतात. आणखी सात किलो वजन लोकसभा निवडणुकांपर्यंत कमी करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
शरद पवार यांनी नियमित व्यायामाद्वारे १५ किलो वजन कमी केले. त्यामुळे त्यांच्या चालण्याची गतीही वाढली आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी तब्बल २० किलो वजन घटविले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणापासून आणखी काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांनी पथ्यपाणी तसेच आहाराची बंधने कटाक्षाने पाळली आहेत. यामुळेच त्यांच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा झाली आहे.

व्यायामाबद्दल जागरूक

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आपल्या निवासस्थानीच ट्रेडमिलवर तसेच कॉन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या (सीसीआय) जिममध्ये व्यायाम करतात.
केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंह, संसदीय कामकाजमंत्री विजय गोयल हेदेखील व्यायामप्रेमी आहेत. सीसीआयच्या जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या राजकारणी नेत्यांची संख्या वाढत आहे.

Web Title:  Modi, Pawar, Jaitley losing weight, 'exercise' to increase political weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.