मोदींनी सुचवली आशिया-आफ्रिका कॉरिडोरची कल्पना
By Admin | Published: May 23, 2017 05:10 PM2017-05-23T17:10:49+5:302017-05-23T18:42:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि भारताच्या पाठिंब्याने आशिया-आफ्रिका विकास कॉरिडोरची कल्पना मांडली आहे
>ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. 23 - एकीकडे चीन वन बेल्ट वन रोड योजनेच्या माध्यमातून अर्धे जग आपल्या अवाक्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी करत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि भारताच्या पाठिंब्याने आशिया-आफ्रिका विकास कॉरिडोरची कल्पना मांडली आहे. गांधीनगर येथे आज आफ्रिकी विकास बँकेच्या 52व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्धाटन करताना मोदींनी ही कल्पना उपस्थितांसमोर ठेवली. अशा स्वरूपाची बैठक भारतात पहिल्यांदाच होत आहे.
यावेळी मोदी म्हणाले, "भारताची आफ्रिकेसोबत असलेली भागीदारी सहकार्याच्या मॉडेलवर आधारित आहे. हे मॉडेल आफ्रिकी देशांच्या गरजांप्रमाणे तयार करण्यात आलेले आहे. जापान दौऱ्यादरम्यान जापानी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जारी करण्यात आलेल्या संयुक्त घोषणापत्रामध्ये आम्ही आशिया आणि आफ्रिकी देशांमध्ये विकास कॉरिडोरचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी आमच्या आफ्रिकी मित्रदेशांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेली ही कल्पना चीनच्या वन बेल्ड वन रोड योजनेला प्रत्युत्तर मानली जात आहे. वन बेल्ट वन रोड योजनेमध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली आहे. याद्वारे आशियाई भूखंडाला हिदी महासागर आणि पॅसिफीक महासागरापर्यंत रस्ते मार्गाने जोडण्यात येणार आहे.
यावेळी मोदी पुढे म्हणाले, "भारत आणि आफ्रिकेमधील संबंध अनेक शतके जुने आहेत. गुजराती लोकसुद्धा आफ्रिकेप्रती आपल्या प्रेमासाठी ओळखले जातात. आफ्रिकेसोबतची आमची भागीदारी सहकार्यावर आधारित आहे. 1996 ते 2016 या काळात आफ्रिकेने भारतामधून 20 टक्के एफडीआय मिळवला आहे."