मोदींनी संसद, देशाला अंधारात का ठेवले ? - काँग्रेस

By admin | Published: December 25, 2015 04:51 PM2015-12-25T16:51:50+5:302015-12-25T16:51:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान भेटीवर देशातील प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे.

Modi put Parliament and country in darkness? - Congress | मोदींनी संसद, देशाला अंधारात का ठेवले ? - काँग्रेस

मोदींनी संसद, देशाला अंधारात का ठेवले ? - काँग्रेस

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २५ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान भेटीवर देशातील प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. इतकी महत्वाची माहिती टि्वटरवरुन जाहीर करु नये, पंतप्रधानांच्या पाकिस्तान भेटीची माहिती टि्वटरवरुन मिळते हे दुर्देव आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध अजूनही इतके सुधरलेले नाहीत कि, दुस-या देशातून येताना त्यांनी पाकिस्तानात थांबावे अशी टिका काँग्रेसचे प्रवक्ते अजॉय कुमार यांनी केली. 

संसदेचे अधिवेशन नुकतेच संपले. संसद आणि देशाला अंधारात का ठेवले ? देशाला आणि संसदेला पंतप्रधानांनी विश्वासात का घेतले नाही ? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. पंतप्रधानांच्या या धाडसाचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होईल.

एनएसए किंवा हार्ट ऑफ एशिया परिषदेमुळे पाकिस्तानसोबतच्या संबंधात फार सुधारणा झालेली नाही. प्रत्यक्षात काय परिस्थिती बदलली त्याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे अशी टीका काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केली. 

 

Web Title: Modi put Parliament and country in darkness? - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.