हाफीज सईदच्या उलट्या बोंबा, म्हणे पाकमधील दहशतवादी हल्ल्यासाठी मोदी जबाबदार

By admin | Published: June 9, 2014 11:53 AM2014-06-09T11:53:40+5:302014-06-09T11:58:53+5:30

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवले आहे.

Modi is responsible for terrorist attacks in Pakistan, says Bomba versus Hafiz Saeed | हाफीज सईदच्या उलट्या बोंबा, म्हणे पाकमधील दहशतवादी हल्ल्यासाठी मोदी जबाबदार

हाफीज सईदच्या उलट्या बोंबा, म्हणे पाकमधील दहशतवादी हल्ल्यासाठी मोदी जबाबदार

Next

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ९ -  मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवले आहे. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानेच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळेही त्याने उधळली आहे. दहशतवादी हल्ले घडवणा-या हाफीजने भारतालाच दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार ठरवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया भारतातून व्यक्त होत आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने सोमवारी ट्विटरवर कराची विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले.  कराचीतील दहशतवादी हल्ल्याची तेहरीक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली असूनही हाफीज म्हणतो, दहशतवाद्यांचा सामना करणा-या पाकिस्तानी सैन्याच्या जवानांना आमचा सलाम. या हल्ल्यामागे भारतातील नरेंद्र मोदींचे नवीन सुरक्षा पथक जबाबदार आहेत. संपूर्ण पाकला माहित आहे आपला खरा शत्रू कोण. पाकिस्तान सरकारने आता तरी भारताविरुध्द कणखर भूमिका घ्यावी असे हाफीज सईद म्हणतो. हाफीज प्रमुख असलेल्या जमात उद दावानेही ट्विटरद्वारे मोदी सरकारलाच या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवले आहे. हाफीजच्या या ट्विटवरुन भारतातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Modi is responsible for terrorist attacks in Pakistan, says Bomba versus Hafiz Saeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.