मोदींनीच उलगडलं आपल्या तणावमुक्त जीवनाचं रहस्य

By admin | Published: April 13, 2017 01:17 PM2017-04-13T13:17:14+5:302017-04-13T13:29:19+5:30

पंतप्रधानपदी असतानाही कोणताही तणाव जाणवू न देता ते कसं काय काम करत असतील ? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल

Modi is the secret of his stress-free life | मोदींनीच उलगडलं आपल्या तणावमुक्त जीवनाचं रहस्य

मोदींनीच उलगडलं आपल्या तणावमुक्त जीवनाचं रहस्य

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदींना असलेलं कामाचं व्यसन सर्वांनाच माहित आहे. दिवसातून तब्बल अठराहून जास्त तास मोदी काम करतात. इतकंच नाही तर लांबचा प्रवास करायचा असल्यास हॉटेलमध्ये झोपण्यापेक्षा विमानात झोपून वेळं वाचवणं ते पसंत करतात. यामुळे वेळेची होणारी बचत पुढे कामाला येते असं त्यांचं म्हणणं आहे. सतत काम करत असतानाही त्यांना तणाव जाणवत नाही. त्यांच्या या ऊर्जेचं सर्वांनाच कौतुक वाटत असतं. पंतप्रधानपदी असतानाही कोणताही तणाव जाणवू न देता ते कसं काय काम करत असतील ? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. 
 
एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत त्यांना ट्विटरवर टॅग केलं होतं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल भारत दौ-यावर आले असताना त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवसभरातील कार्यक्रमांची यादी या महिलेने ट्विटरवर टाकली होती. त्यानुसार सकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्यापासून ते एनडीएमधील मित्रपक्षांसोबत डीनर आणि मध्यरात्रीपर्यंत होणारी चर्चा असा एकूण कार्यक्रम होता. 
 
या महिलेने मोदींचा हा दिनक्रम ट्विट करत "आपण सगळे सतत तणाव असल्याची तक्रार करत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वेळापत्र पहा", असं म्हटलं होतं. या महिलेने मोदींनाही टॅग केलं होतं.
स्वत: मोदी यांनी 2012 रोजी दिलेल्या मुलाखतीत आपण दिवसेंदिवस कामाच्या व्यसनी जात असल्याचं कबूल केलं होतं. "डॉक्टरांनी मला पाच तासांची झोप घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. पण मी जास्तीत जास्त तीन ते चार तास झोपतो. तितक्या वेळातही मला अतिशय शांत झोप लागते", असं मोदी त्या मुलाखतीत बोलले होते. "सकाळी उठल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत माझ्यात तितकीच ऊर्जा असते. योगा आणि प्राणायम यामामगचं गुपित असावं. मी रोज न चुकता योगा आणि प्राणायम करतो. जेव्हा कधी मला तणाव जाणवतो मी दिर्घ श्वास घेतो आणि फ्रेश होतो", असंही मोदी बोलले होते. 
 
इतक्या वर्षांमध्ये काही बदललं असेल तर ते म्हणजे मोदींचं वेळापत्रक. पंतप्रधान झाल्यापासून मोदी व्यस्त झाले आहेत. त्यांच्या या सवयीमुळे इतर मंत्र्यांचीही झोप उडाली आहे. "आमचे पंतप्रधान स्वत: झोपत नाहीत, आणि आम्हालाही झोपत नाहीत", असं वैंकय्या नायडू मिश्किलपणे बोलले होते.
 

Web Title: Modi is the secret of his stress-free life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.