आधी मोदी, शहांनी पद सोडावे- काँग्रेस वाक्युद्ध : दिल्लीतील संभाव्य पराभवाबाबत अपश्रेयाचा वाद

By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:20+5:302015-02-10T00:56:20+5:30

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला यश न मिळाल्यास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असे उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील संभाव्य वाईट कामगिरीची जबाबदारी स्वीकारतील काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

Before Modi, Shah should step down - Congress question: Delhi's argument for dissolution of possible defeat | आधी मोदी, शहांनी पद सोडावे- काँग्रेस वाक्युद्ध : दिल्लीतील संभाव्य पराभवाबाबत अपश्रेयाचा वाद

आधी मोदी, शहांनी पद सोडावे- काँग्रेस वाक्युद्ध : दिल्लीतील संभाव्य पराभवाबाबत अपश्रेयाचा वाद

Next
ी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला यश न मिळाल्यास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राजीनामा द्यावा असे उत्तर काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील संभाव्य वाईट कामगिरीची जबाबदारी स्वीकारतील काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
दिल्लीत काँग्रेसने चांगली कामगिरी न केल्यास प्रियंका गांधी मोठी भूमिका बजावतील काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले. केंद्र सरकारच्या कामगिरीवर मोदी आणि शहा यांनी सार्वमत मागितले असल्याने त्यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा. पंतप्रधानांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या निवडणुकीत पूर्ण ताकद झोकत उडी घेतली होती, असे ते म्हणाले.
काही उद्योग लॉबींनी मोदींनी न केलेल्या कामगिरीकडे लक्ष वेधणाऱ्या जाहिराती वृत्तपत्रांत दिल्या होत्या, असा टोलाही त्यांनी मारला. दिल्लीत पराभव झाल्यास राहुल गांधींना पर्याय शोधला जाणार काय? पक्षात सखोल चिंतन होईल काय? यावर अजयकुमार म्हणाले की, दिल्लीतील निवडणुका अजय माकन यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या असून त्यांनी याआधीच निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला आहे. आम्ही राहुल गांधींबाबत नंतर बोलू. आधी मोदी आणि शहा यांनी पायउतार व्हावे. सध्या जे बाहेर आले ते एक्झिट पोलचा अंदाज आहे. घाई करू नका असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: Before Modi, Shah should step down - Congress question: Delhi's argument for dissolution of possible defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.