पाकने आखला डाव, अशी करणार मोदींची गोची

By admin | Published: October 9, 2016 08:49 AM2016-10-09T08:49:02+5:302016-10-09T09:05:24+5:30

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुदयावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे.

Modi should be ready to attack Pakistan | पाकने आखला डाव, अशी करणार मोदींची गोची

पाकने आखला डाव, अशी करणार मोदींची गोची

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडवार पडलेल्या आणि मोदींच्या बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून दुखावलेल्या पाकने आता भारता विरुद्ध गरळ ओकण्यासाठी नवी रणरनीती आखली आहे. संघाच्या विचारसरणीवरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. पाक मीडियानुसार संसदेच्या एका महत्त्वाच्या समितीने भारताच्या कमकुवत बाजू उघड करण्याच्या रणनीतीची शिफारस केली आहे.

या रणरनीतीनुसार २२ मुद्द्यांचा ७ पानी अहवालास पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि दलित हे भारतात कसे वेगळे पडत आहेत, याचे दाखले देत भारताची कमकुवत बाजू जगासमोर आणि भारतातील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असेही यामध्ये स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध असणाऱ्या भारतीय जनतेचा फायदा करुन घेण्याचा पाकड्यांनी डाव आखला आहे.

७ पानी शिफारसीमध्ये म्हटले गेले आहे की, जम्मू-काश्मिरच्या मुद्यावर दोन्ही देशांचा एकमेकांवरील विश्वास कायम ठेवण्याबाबत आणि द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा व्हायला हवी. तर पाकने काश्मिरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उचलायला हवा तसेचं पाकच्या धरतीवर दहशतवाद्यांना थारा देऊ नये.

दरम्यान, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत दोन्ही देशांतील संबंध सुधारणे अशक्य असल्याच मत पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Modi should be ready to attack Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.