‘अयोध्या सुनावणीबाबत मोदींनी हस्तक्षेप करावा’
By admin | Published: January 14, 2016 12:17 AM2016-01-14T00:17:43+5:302016-01-14T00:17:43+5:30
सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी वादावर दैनंदिन सुनावणी घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी वादावर दैनंदिन सुनावणी घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. या वादावर त्वरित निर्णय होऊन या वर्षाअखेरीस अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू केले जावे यासाठी ते गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राममंदिर वादावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर दैनंदिन सुनावणी केली जावी, असे याचिकाकर्ते हिंदू व मुस्लीम नेत्यांना वाटत असल्याचे विधान असासुद्दीन ओवैसी यांनी केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. हिंदू- मुस्लीम नेत्यांमधील परस्पर सामंजस्य व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाणे शक्य होईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)