सरकार पाडण्याचा ‘ड्रामा’ मोदींनी थांबवावा : गेहलोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:10 AM2020-08-02T00:10:11+5:302020-08-02T00:10:32+5:30
बंडखोरांना माफीबाबत श्रेष्ठींनी ठरवावे
जयपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याच्या भाजपाच्या कारस्थानात कथित सामील असलेल्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी गजेंद्र सिंग शेखावत यांच्यासह धर्मेद्र प्रधान यांचेही नाव घेतले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील हा पाडापाडीचा ‘ड्रामा’ थांबवावा, असे आवाहन केले. सचिन पायलट व अन्य १८ काँग्रेस आमदारांच्या कथित बंडानंतर जयपूरबाहेरच्या फेअरमॉन्ट रिसॉर्टमध्ये ठेवलेल्या काँग्रेस आमदारांना शुक्रवारी सायंकाळी जैसलमेरमधील रिसॉर्टमध्ये हलविण्यात आले. तेथून जयपूरला परतताना पत्रकारांशी बोलताना गेहलोत यांनी शेखावत व प्रधान यांच्यासह उतरही काही केंद्रीय मंत्री या पाडापाडीत सहभागी असल्याचा आरोप केला आणि पंतप्रधान मोदींनी हा ‘ड्रामा’ थांबवावा, असे आवाहन केले.
बंडखोरांबाबत मवाळ रोख
च्सचिन पायलट यांच्यावर अगदी ‘निकम्मा’ म्हणण्यापर्यंत तोंडसुख घेणाऱ्या गेहलोत यांचा बंडखोरांबद्दल जरा मवाळ रोख दिसला. बंडखोरांना माफ करणार का, असे विचारता ते म्हणाले की, ते पक्षाच्या हायकमांडने ठरवायचे आहे. हायकमांडने माफ केल्यास मी त्यांना (बंडखोरांना) आलिंगनही देईन.
च्माझा यात काही व्यक्तिगत स्वार्थ नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला व मला भरभरून दिले. मला केंद्रात मंत्री केले, अखिल भारतीय सरचिटणीस केले व प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष आणि तीन वेळा मुख्यमंत्रीही केले. याहून मला आणखी काय हवे आहे. मी जे काही करतो आहे ते लोकांसाठी करतो आहे.