नेपाळ हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, धर्मसभा अध्यक्षांची मागणी

By admin | Published: June 25, 2016 04:50 PM2016-06-25T16:50:34+5:302016-06-25T16:50:34+5:30

नेपाळ हे पुन्हा हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी नेपाळच्या राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष माधव भट्टाराई यांनी केली आहे

Modi should take the lead in building Nepal's Hindu Rashtra; | नेपाळ हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, धर्मसभा अध्यक्षांची मागणी

नेपाळ हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, धर्मसभा अध्यक्षांची मागणी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. 25 - नेपाळ हे पुन्हा हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा व त्यासाठी नेपाळमध्ये  सुरू असलेल्या चळवीला समर्थन द्यावे अशी मागणी  नेपाळच्या राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष माधव भट्टाराई यांनी केली. तसा ठरावही रामनाथी येथे पार पाडलेल्या पाचव्या अखिल भारतीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला. 
 
अधिवेशनाला आलेले भट्टरयी पत्रकार परिषदेत बोलताना  म्हणाले की नेपाळ हे 94 टक्याहून अधिक हिंदू नागरिक असलेले हिंदुराष्ट्रच आहे. देशात आलेल्या साम्यवादी सरकारने ते निधर्मी राष्ट्र घोषित जरी केले असले तरी नेपाळची संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. नेपाळ पुनश्च हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी सुरू असलेल्या नेपाळी लोकांच्या आंदोलनाला भारताने समर्थन दिल्यास नेपाळी लोकांचा मार्ग सोपा होईल असे त्यांनी सांगितले.
 
नेपाळमध्ये मधेंसीच्या चळवळीला लोकांचा पाठिंबा नाही, परंतु केवळ भारताने या चळवळीला पाठिंबा दिल्यामुळे या चळवळीचा प्रभाव जाणवत आहे. उलट नेपाळ हे पुन्हा हिंदूराष्ट्र घोषित करण्यासाठीच्या आंदोलनाला जोर चढला आहे आणि मोठ्या प्रमाणांवर लोकांचा पाठिंबाही आहे. लोकाश्रय नसलेल्या चळवळीला पाठिंबा देण्यापेक्षा लोकाश्रय असलेल्या चळवळीला भारताने समर्थन द्यावे आणि नेपाळ हिंदुराष्ट्र बनण्यासाठी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या बरोबर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता रमेश शिंदे, तेलंगण येथील भाजपचे आमदार टी राजसिंह, वाराणसी येथील हिंद विद्या केंद्राचे संचालक रामेस्वर मिश्र आणि हिंद विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.
 

Web Title: Modi should take the lead in building Nepal's Hindu Rashtra;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.