मोदी-सिंग भेटीने हलचल
By admin | Published: May 28, 2015 01:22 AM2015-05-28T01:22:14+5:302015-05-28T01:22:14+5:30
रालोआ सरकारवर बुधवारी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर तासाभरातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या ७, रेसकोर्स या शासकीय निवासस्थानी गेले.
४० मिनिटे चर्चा : भाजपा तसेच काँग्रेसच्या अंत:स्थ गोटातही अनभिज्ञताच
हरीष गुप्ता- नवी दिल्ली
रालोआ सरकारवर बुधवारी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर तासाभरातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या ७, रेसकोर्स या शासकीय निवासस्थानी गेले. मोदींच्या टष्ट्वीटनुसार ४० मिनिटांच्या या ‘ग्रेट भेटी’ने राजधानीत अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपा तसेच काँग्रेसच्या अंत:स्थ गोटात काही काळ या भेटीविषयी अनभिज्ञताच होती.
उभय बाजूंनी आक्रमक टीकेच्या फैरी झडल्यानंतर अल्पावधीतच मोदी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यानुसार सिंग यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. गेल्या वर्षभरात मोदी व सिंग यांची शासकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा जाहीर भेट झाली आहे. पण त्या दोघांतच झालेली ही पहिली भेट राजकीय चर्चेचा विषय बनली. अर्थात मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सौजन्यापोटी केलेल्या फोन कॉलला नुकत्याच पायउतार झालेल्या डॉ. सिंग यांनी त्वरित प्रतिसाद दिला होता, या २०१४च्या मे महिन्यातील आठवणीलाही या निमित्ताने उजाळा मिळाला.
संपुआ सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ‘घटनाबाह्य’ शक्ती’च्या रूपात कार्यरत होत्या. परंतु आता मात्र घटनात्मक मार्गानेच सरकार चालविले जात आहे, अशी टीका मोदी बुधवारी मोदी यांनी एका मुलाखतीत केली. आम्ही घटनात्मक मार्गाने काम करीत आहोत आणि कुण्या ‘घटनाबाह्यह्ण शक्तींचे मुळी ऐकतच नाहीत, असा आरोप असेल तर मी स्वत:ला या आरोपाबद्दल दोषी मानतो.’ मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवरही शरसंधान केले. तर काँग्रेसच्या एका कार्यक्रमात डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर आकस्मिकपणे आक्रमक पलटवार केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे. आपण कधीही स्वत:च्या, कुटुंबाच्या किंवा मित्र परिवाराच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केलेला नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. २जी लायसेंसप्रकरणी सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. शिवाय भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी असंख्य घोटाळ््यांविषयी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी हे वक्तव्य केले. तोच बुधवारच्या भेटीचा संदर्भ असावा, असा कयास आहे.
काही कारणांमुळे मंगळवारी ही भेट होऊ शकली नाही आणि बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता उभय नेत्यांची भेट घडून आली, असे मनमोहनसिंग यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
मोदींना मनमोहनसिंग यांच्यासोबत आर्थिक आणि विदेश धोरणाशी संबंधित मुद्यांवर चर्चा करावयाची होती. त्यामुळे त्यांच्या पुढाकारानेच ही भेट घडून आली.
- आनंद शर्मा, नेते, काँग्रेस
च्डॉ. मनमोहनसिंगजी यांना भेटून आणि ७, रेसकोर्सवर त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करून खूप आनंद झाला. आमची ही भेट ग्रेटभेट होती,’ असे मोदी यांनी या भेटीनंतर टिष्ट्वटरवर म्हटले आहे. या भेटीचा हृद्य फोटोही मोदींच्या टष्ट्वीटर हँडलवर टाकण्यात आला.
च्राहुल गांधी यांच्या ‘सुटाबुटातील सरकार’ या आरोपावर मोदी म्हणाले, वर्ष लोटले तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव अद्याप पचविता आलेला नाही. जनतेने काँग्रेसला तिच्या चुका व पापांबद्दल दंड दिला आहे.