मोदी स्वत:ची 'मन की बात' देशावर लादतात - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 08:23 PM2017-08-02T20:23:58+5:302017-08-02T20:24:22+5:30
देशातील जनतेची मन की बात न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.
नवी दिल्ली, दि. 02 - देशातील जनतेची मन की बात न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करुन देश चालवत आहेत, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली. नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आज ते बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदीवर हा आरोप केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा न करता ते संघाशी बोलतात. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे. काँग्रेसला देशातील सर्वांचा आवाज राजकारणात आणायचा आहे. मात्र भाजपला सर्वसामान्यांचा आवाज राजकारणात नको आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे काँग्रेस व्यावसायिक लोकांचा आवाज समोर आणण्यासाठी नव्या समितीवर काम करत आहे. राहुल गांधीच्या म्हणाले व्यवसायिक लोकांना राजकारणात सामाविष्ट कराण्याचा हा एक प्रयत्न आहे. काल मंगळवारी राहुल गांधी यांनी आपला मतदार संघ अमेठी जवळील जगदीशपूरच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्गवर हेत असेल्या भूमी अधिग्रहणाच्या प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय लखनऊमधील 90 शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आज दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शशी थरुर, मिलिंद देवरा उपस्थित होते. यावेळी त्यांनी एका नव्या वेबसाईटचे लाँचिग केलं. असंघटित कामगार वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून प्रोफेशन काँग्रेसची उभारणी करण्यात येणार आहे. असंघटित कर्मचाऱ्यांना राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसकडून या आघाडाची निर्मिती केली जाणार आहे त्याद्वारे व्यावसाईक लोकांना काँग्रेसमध्ये जोडलं जाईल. यावेळी ते म्हणाले की, देशातील व्यवसाईक लोकांचा आवाज राजकारण्याप्रर्यंत पोहचेल.