मोदी समर्थक प्रीती पटेल यांचा ब्रिटिश सरकारमध्ये समावेश!
By admin | Published: July 16, 2014 05:21 PM2014-07-16T17:21:54+5:302014-07-16T17:21:54+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी समर्थक मानली जाणा-या प्रीती पटेल यांचा नुकताच ब्रिटिश सरकारमधील मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन टीम
लंडन, दि. १६ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी समर्थक मानली जाणा-या प्रीती पटेल यांचा नुकताच ब्रिटिश सरकारमधील मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी प्रीती पटेल यांचा समावेश करून त्यांच्याकडे कोषागार (ट्रेझरी )मंत्रीपद दिले आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या दाव्यानुसार ४२ वर्षीय प्रीती पटेल या विथेम एसेक्स या मतदारसंघातून २०१० साली खासदार म्हणून पहिल्यांदा निवडूण आल्या आहेत. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून भारत दौ-यावर आले त्यावेळी प्रीती पटेल याही पंतप्रधानांसोबत भारत दौ-यावर आल्या होत्या. भारत-ब्रिटन या दोन्ही देशांतील संबंध यामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करणा-यांमध्ये प्रीती पटेल यांना मोठ्या जबाबदारीचे खाते दिले असून त्या सेवा करांसंबंधी निर्णय घेणार आहेत. लंडनमधील किले विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविणा-या प्रीती पटेल यांचा लंडनमध्येच जन्म झाला असून त्या विवाहित आहे तसेच त्यांना ५ वर्षाचा मुलगा आहे. नरेंद्र मोदी हे भारतात सुधारणा करण्याबरोबरच अनेक बदल घडवून आणतील असा आपल्याला विश्वास असल्याचे प्रीती पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.