ओबामा पायउतार झाल्याने सोशल मीडियासाठी मोदीच ट्रम्प कार्ड
By admin | Published: January 20, 2017 12:53 PM2017-01-20T12:53:55+5:302017-01-20T12:59:24+5:30
बराक ओबामांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - बराक ओबामा यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून आज नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्याम ओबामा यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले 'राजकीय नेता' बनतील. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह राहणा-या मोदींचे लाखो चाहते असून फेसबूक, ट्विटर, यूट्यूब आणि गूगल प्लस या सर्व सोशल माध्यमांवर फॉलो करण्यात येणा-या नेत्यांमध्ये मोदी प्रथम क्रमाकांवर विराजमान होणार आहेत.
बराक ओबामांचे ट्विटरवर 8 कोटी 7 लाख 24 हजार 780 फॉलोअर्स आहेत, तर दुस-या स्थानावर असलेल्या मोदींचे फॉलोअर्स आहेत 2 कोटी ६४ लाख ८० हजार ५१८. मात्र आता ओबामांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे मोदी अव्वल स्थानावर आले आहेत. मोदींनंतर नंबर लागतो तो अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा, त्यांचे एकूण फॉलोअर्स आहेत २ कोटी ४ लाख ७५ हजार १३२.
तर मोदींच्या फेसबूक पेजच्या लाईक्सची संख्या आहे ३ कोटी ९२ लाख ७३ हजार ८४९. गूगल प्लसवर मोदींचे 30 लाख फॉलोअर असून इन्स्टाग्रामवर 50 लाखांहून अधिक आणि यूट्यूबवर 5 लाखाहूंन अधिक जणांनी त्यांना फॉलो केले आहे. ओबामांच्या फेसबूक पेजच्या लाईक्सची संख्या 5 कोटी 28 लाख आहे.