‘मोदींचे आवाहन हृदयापासून हवे’

By admin | Published: August 11, 2016 01:17 AM2016-08-11T01:17:39+5:302016-08-11T01:17:39+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘इन्सानियत’, जमुरियत’ आणि ‘काश्मिरियत’ ही आवाहने ओठांतूनच नव्हे तर हृदयापासून लोकांपर्यंत गेली पाहिजेत तरच हृदय आणि मन यांची एकात्मता साधली जाईल

'Modi urged from heart' | ‘मोदींचे आवाहन हृदयापासून हवे’

‘मोदींचे आवाहन हृदयापासून हवे’

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ‘इन्सानियत’, जमुरियत’ आणि ‘काश्मिरियत’ ही आवाहने ओठांतूनच नव्हे तर हृदयापासून लोकांपर्यंत गेली पाहिजेत तरच हृदय आणि मन यांची एकात्मता साधली जाईल, अशा शब्दांत बुधवारी काँग्रेसने मोदी यांना राज्यसभेत फटकारले.
काश्मीरमधील विद्यमान परिस्थितीचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर खोऱ्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवावे व हिंसाचार थांबविण्याचे आवाहन संसदेनेही करावे, असे म्हटले. त्यापुढे जात, काश्मीर प्रश्नावर मध्य प्रदेशात बोलणार पंतप्रधान संसदेत का बोलायला तयार नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
गेल्या ३३ दिवसांपासून खोऱ्यात हिंसाचार सुरू आहे. काश्मिरींच्या चांगल्या भवितव्यासाठी आम्ही येथून शांतता राखण्याचे आवाहन येथून केले पाहिजे. देशाचा एकमुखी आवाज संसदेतून गेला पाहिजे. शिवाय सर्वपक्षीय शिष्टमंडळही तेथे पाठविण्यात यावे, असे आझाद म्हणाले. या संदर्भातील घोषणा लगेचच व्हावी कारण संसदेचे अधिवेशन येत्या दोन दिवसांत संपत आहे.

Web Title: 'Modi urged from heart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.