नोव्हेंबरमध्ये मोदी पाकिस्तान दौ-यावर जाणार ?
By admin | Published: September 6, 2016 05:02 PM2016-09-06T17:02:41+5:302016-09-06T17:04:01+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेला उपस्थित राहू शकतात.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेला उपस्थित राहू शकतात असे वक्तव्य पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्ताने मंगळवारी केले. कराचीमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.
मागच्यावर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवडयात अफगाणिस्तानच्या संसदेचे उदघाटन करुन मायदेशात परतत असताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार टीका केली होती.
मोदी यांच्या या धावत्या पाकिस्तान भेटीनंतर लगेच आठवडयाभरात हवाईदलाच्या पंजाबमधील पठाणकोट तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत.
काश्मीरमध्ये अस्थिरतेला पाकिस्तान खतपाणी घालत आहे. सोमवारी जी-२० परिषदेच्या दुस-यादिवशी जागतिक नेत्यांसमोर बोलताना मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता दक्षिण आशियातील एक देश दहशतवादाचा धोरणासारखा वापर करत असल्याचा आरोप केला होता.