मोदी भेटीनंतर "भक्त" झाले ट्रम्प ! म्हणाले, मोदी "महान पंतप्रधान"
By admin | Published: June 27, 2017 01:14 AM2017-06-27T01:14:43+5:302017-06-27T06:59:11+5:30
दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
Next
>
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 27 - दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. व्हाइट हाऊसमध्ये पोहोचल्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी मोदींचं स्वागत केलं. यावेळी द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "महान पंतप्रधान" असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना हा माझा नाही तर सर्व भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींना "सच्चा दोस्त" म्हणणा-या डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने पंतप्रधान मोदींचं व्हाइट हाऊसमध्ये उत्साहात स्वागत केलं. व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करताना त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. दोन्ही नेते चर्चेला बसण्यापूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं.
मोदी महान पंतप्रधान- ट्रम्प
यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले मोदी महान पंतप्रधान आहेत, माझं त्यांच्यासोबत बोलणं होत असतं, मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.
हा माझा नाही भारतीयांचा सन्मान- मोदी
ट्रम्प यांच्याकडून उत्साहात झालेल्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले. माझं स्वागत म्हणजे 125 कोटी नागरिकांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले.
डिनरचं आयोजन-
भेटीनंतर मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प वर्किंग डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच भोजन समारंभ होता.