YouTubeवर PM मोदी नंबर 1; एक कोटींच्या पार गेले सब्सक्राइबर्स, जगातील मोठ-मोठ्या नेत्यांनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:36 PM2022-02-01T17:36:25+5:302022-02-01T17:37:02+5:30

PM मोदी भलेही 2007 मध्ये यूट्यूबवर आले असतील. मात्र, त्यांनी पहिला व्हिडिओ 4 वर्षांनंतर म्हणजेच 18 मार्च 2011 रोजी अपलोड केला होता.

Modi vs Rahul Gandhi PM Narendra Modi youtube channel subscribers cross 1 crore  | YouTubeवर PM मोदी नंबर 1; एक कोटींच्या पार गेले सब्सक्राइबर्स, जगातील मोठ-मोठ्या नेत्यांनाही टाकलं मागे

YouTubeवर PM मोदी नंबर 1; एक कोटींच्या पार गेले सब्सक्राइबर्स, जगातील मोठ-मोठ्या नेत्यांनाही टाकलं मागे

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर 1 कोटी सबस्क्रायबर्स झाले आहेत. एवढे सबस्क्रायबर्स असणारे ते जगातील पहिले नेते आहेत. 26 ऑक्टोबर 2007 रोजी पीएम मोदींनी यूट्यूब जॉईन केले होते. जागतिक नेत्यामध्ये मोदींनंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचा क्रमांक लागतो. त्यांचे 36 लाख सबस्क्रायबर्स आहेत.

गुजरात बजेट-2011 संदर्भात अपलोड केला होता पहिला व्हिडिओ - 
PM मोदी भलेही 2007 मध्ये यूट्यूबवर आले असतील. मात्र, त्यांनी पहिला व्हिडिओ 4 वर्षांनंतर म्हणजेच 18 मार्च 2011 रोजी अपलोड केला होता. हा व्हिडिओ गुजरात बजेट 2011-12 चा होता. या व्हिडिओवर 35,375 व्ह्यूज आहेत. तसेच 1400 जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. यानंतर त्यांच्या चॅनलवर सातत्याने व्हिडिओ येत राहिले.

मोदींच्या चॅनलवरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांग व्यक्तीचा आहे. 14 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मोदी एका तरुणाला भेटत आहेत. हा तरुण मोदींशी बोलतो आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतो. हा व्हिडिओ काशीचा असून 19 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला तब्बल 7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 11 लाख लाईक्स मिळाले आहेत.

164 कोटींहून अधिक व्ह्यूज -
पंतप्रधान मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra Modi नावानेच आहे. या चैनलवर आतापर्यंत 164 कोटी 31 लाख 40 हजार 180 हून अधिक व्ह्यूज आहेत. या चॅनलवरून ते PMO इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि Exam Warriors Mantras हे YouTube चॅनेल प्रमोटही करतात. एवढेच नाही, तर ते सरकारशी संबंधित योजना, लाइव्ह इव्हेंट्सदेखील आपल्या चॅनलवर दाखवतात.

भारतात मोदींनंतर सर्वाधिक सब्सक्राइबर्स राहुल गांधींचे -
भारतात नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक यूट्यूब सब्सक्राइबर्स राहुल गांधीचे आहेत. 5.25 लाख लोकांनी राहुल यांचे यूट्यूब चॅनल  सबस्क्राइब केले आहेत. यानंतर शशी थरूर 4.39 लाख सब्सक्रइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर असदुद्दीन ओवेसी यांचे 3.73 लाख सब्सक्राइबर्स आहेत.

Web Title: Modi vs Rahul Gandhi PM Narendra Modi youtube channel subscribers cross 1 crore 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.