मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 03:18 PM2017-12-20T15:18:23+5:302017-12-20T15:22:21+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरूच ठेवले आहेत.

Modi was old, he should go to Himalyala - Khichak critic of Jignesh Merchant | मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीका

मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीका

Next

नवी दिल्ली -  गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरूच ठेवले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतील मोदींवर स्वैर टीका करताना जिग्नेश मेवाणी यांनी मोदी आता म्हातारे झाले आहेत. त्यांनी संन्यास घेऊन हिमालयात जावं, असा खोचक सल्ला मोदींना दिला आहे. तसेच आपण केलेल्या टीकेबाबत खुद्द राहुल गांधी यांनीही माफी मागण्यास सांगितले तरी माफी मागणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे. 
या मुलाखतीत मेवाणी म्हणाले, "2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते आपली जुनी रटाळ भाषणे लोकांना सुनावत आहेत. त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून विश्रांती घेत निवृत्ती स्वीकारली पाहिजे. तसेच हिमालयात जाऊन तेथेचा पुढील जीवन जगावं," या वक्तव्यानंतर माफी मागणार का अशी विचारणा केली असता मेवाणी यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला. "खुद्द राहुल गांधींनी जरी मला माफी मागायला सांगितले तरी मी माघार घेणार नाही. मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे, असे त्यांनी सांगितले. 
गुजरातमध्ये भाजपाच्या जागांमध्ये झालेल्या घटीबाबत त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा गुजरातमध्ये 150 जागा जिंकण्याचा दावा करत होते. मात्र त्यांचे पुरते गर्वहरण झाले आहे. 2019 सालीसुद्धा हेच होईल. हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे. आम्ही सभागृहापासून रस्त्यापर्यंत आपल्या आंदोलनावर भर देऊ आणि यांना 2019 साली सत्तेतून खाली खेचू. देशात फूट पाडणाऱे राजकारण जनतेला समजले आहे. त्यामुळे देशाला आता आमच्यासारख्या दलित, युवा आंदोलनांमधून समोर आलेल्या युवकांची गरज आहे.  
दरम्यान, जिग्नेश मेवाणीने आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक शायरी लिहून  सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपल्यावर काँग्रेस आणि राहुल गांधींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. 

Web Title: Modi was old, he should go to Himalyala - Khichak critic of Jignesh Merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.