मोदी आणणार आमिर, शाहरुख आणि सलमानला एकत्र
By Admin | Published: April 28, 2016 05:38 PM2016-04-28T17:38:11+5:302016-04-28T17:39:18+5:30
बॉलिवूडमधील अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांना एकाच स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन येणार आहेत.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - बॉलिवूडमधील अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांना एकाच स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला येत्या २६ मे राजी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने मोदी सरकार द्वितिय वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूडमधील अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
दिल्लीतील इंडिया गेटजवळ हा सोहऴा करण्यात येणार असून जवऴजवळ ६०,००० लोकांची उपस्थिती राहणार आहे. तसेच, या सोहळ्याला 'जरा मुस्कुरा दो' असे नाव देण्यात आले असून यामध्ये मोदी सरकारच्या दोन वर्षातील कामांच्या आढाव्यांची शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहे. मोदी सरकारने गेल्यावर्षी एक वर्षपूर्ण झाल्यानंतर 'साल एक, शुरुवात अनेक' अशा नावाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते पूर्णपणे फसले होते.
केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री (कर्नल) राज्यवर्धन सिंग राठोड यांनी यासंदर्भात गेल्या आठवड्यात चर्चा केली.
मिऴालेल्या माहितीनुसार, 'जरा मुस्कुरा दो' सोहळ्याचे उद्धाटन बॉलिवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच, या सोहऴ्याला अभिनेता आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह संगीतकार ए आर रेहमान, अजय देवगण, रितेश देशमुख, राजकुमार हिराणी, सायना नेहवाल आणि इतर दिग्गज मंडळींना निमंत्रण पाठविण्यातआले आहे.