'मोदीकेअर व्हेरी फेअर'... अँजिओप्लास्टी, डिलिव्हरी, नी-रिप्लेसमेंट होणार स्वस्तात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:48 AM2018-05-24T10:48:58+5:302018-05-24T11:03:16+5:30
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत निश्चित असलेल्या किंमतीच्या 15 ते 20 टक्के किंमत कमी होणार आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना (एनएचपीएस) अंतर्गत देशातील विविध आजारांवरील उपचारासाठी पैसा खर्च करण्याच्या दिशेवर पावलं उचचली जात आहेत. याअंतर्गत कोरोनरी बायपास, गुडघा प्रत्यारोपण आणि सी-सेक्शन अशा उपचारांवर होणारा खर्च कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत निश्चित असलेल्या किंमतीच्या 15 ते 20 टक्के किंमत कमी होणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने एनएचपीएसअंतर्गत 1354 वैद्यकीय पॅकेजची यादी तयार केली आहे. यामध्ये ह्रदय विकार, डोळ्यांचे आजार, लहान मुलांचे आजार, मुत्राशयातील आजार अशा विविध आजारांवरील उपचाराचा या वैद्यकीय पॅकेजमध्ये सहभाग आहे. उदाहरण- व्हर्टेब्रर ऍन्जियोप्लास्टीची किंमक 80 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
या यादीमध्ये मुलांवरीश शस्त्रक्रियेबरोबरच कर्करोग तसंच मानसिक आजारांच्या उपचारासाठीचे विविध पॅकेज आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऍन्जियोप्लास्टीची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे, सी-सेक्शनच्या उपचारासाठीची किंमत दीड लाख रूपये आहे तर संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण करण्यासाठी उपचाराची किंमत साडे तीन लाख रूपये आहे. पण ही किंमत कमी होणार आहे.
नीति आयोग आणि इंडियन मेडिकल रिसर्च काऊन्सिलच्या सल्ल्यानंतर तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये सरकारी सुविधा मिळविण्यासाठी हॉस्पिटलमध्ये किती दिवस उपचार घेण्यासाठी आहात आणि मान्यतेसाठी सर्जरीच्या आधी आणि नंतर तपासणीचीही विस्ताराने चर्चा होईल. या कागदपत्रावर राज्य सरकारकडून मतं मागितली आहेत.
आयुष्यमान भारतचे सीईओ इंदू भूषण यांनी सांगितलं की. पंतप्रधान राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत विविध आजारांवरील उपचाराची रक्कम ठरविण्यासाठी सीजीएचएस आणि राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेच्या ठरलेल्या रक्कमेचा उपयोग रेफरंट पॉइंट म्हणून केला जाईल. नव्या योजनेअंतर्गत सीजीएचएसनुसार 15-20 टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे. त्यामुळे कमी पैशात रूग्णांना जास्ती उपचार घेता येतील.