मोदीजी तुम्ही सर्वांच ऐकता, माझही ऐका..., कठुआच्या चिमुकलीने पंतप्रधानांना केले खास आवाहन; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:16 PM2023-04-15T12:16:52+5:302023-04-15T12:22:53+5:30
“मोदीजी कसे आहात? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते."
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी गप्पा मारत असल्याचे दिस आहे. सीरत नाज या लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात ती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तिची शाळा बांधण्याची मागणी करत आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावातील रहिवासी असलेल्या सीरतचे म्हणणे आहे की, मोदीजींनी चांगली शाळा बांधली पाहिजे. व्हिडिओमध्ये तिने शाळेची इमारत किती अस्वच्छ असा दावा तिने केला आहे. तसेच योग्य स्वच्छतागृह नसल्यामुळे लहान मुलांना जवळच्या नाल्यात लघुशंका करावी लागते.
दुधासारखी स्वच्छता भाजपातून आली, कलंकित नेतेही फुलले...', काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर एक लाखाहून अधिक यूजर्सनी याला लाईक केले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ती मुलगी म्हणते, “मोदीजी कसे आहात? तुम्ही ठीक आहेत का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते. तुम्ही सर्वांचे ऐकता. आज माझे ऐका.'' यानंतर ती शाळा दाखवते आणि म्हणते की, ही आमची शाळा आहे आणि हे मुख्याध्यापकांचे कार्यालय आहे. बघा आमच्या शाळेचा मजला किती घाणेरडा झाला आहे. आम्हाला इथे बसावे लागते. तुम्ही चांगली शाळा बांधा. मी तुम्हाला शाळेची मोठी इमारत दाखवते. गेल्या पाच वर्षापासून किती घाणेरडी इमारत आहे.
यानंतर ती शाळेतील आतील भाग दाखवते आणि मजला किती गलिच्छ आहे ते सांगते. यामुळे आमचा गणवेश घाण होतो आणि मामा आम्हाला मारतात. यानंतर, मुलगी शाळेच्या वरच्या मजल्यावर जाते आणि व्हिडिओमध्ये इमारतीचा मजला दाखवते. यात ती पीएम मोदींना शाळा चांगली बनवण्याची मागणी करते. ती म्हणते, “माझंही ऐक. मजला किती घाणेरडा आहे ते पहा.” यानंतर ती शाळेचे शौचालय किती गलिच्छ आहे हे पाहण्यासाठी दाखवते. "मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता." मी पण एक लहान मुलगी आहे, माझे पण ऐका. आमची शाळा चांगली बनवा. खूप सुंदर शाळा बांधा म्हणजे आम्हाला गोणपाट घालून बसावे लागणार नाही, असंही ती पुढ म्हणते.