मोदींचा बर्थडे... 21 दिवस साजरा होणार, 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमातून लोकसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:06 AM2021-09-17T11:06:00+5:302021-09-17T11:13:29+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस देशभरात साजरा होत आहे. देशातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपकडून आजपासून 3 आठवडे म्हणजेच 7 ऑक्टोबरपर्यंत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे, मोदींच्या वाढदिवसाचे 21 दिवस सेलिब्रेशन होत असल्याचे दिसून येते.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !#HappyBdayModijipic.twitter.com/F9KfIy3Jiw
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 17, 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात 7 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.
राष्ट्रसेवा और जनहित को सर्वोपरि रखने वाले सच्चे कर्मयोगी, आदर्शवादी राजनेता और देश के यशस्वी प्रधानसेवक श्री नरेन्द्र मोदी जी को समस्त भाजपा परिवार की ओर से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। #HappyBdayModijipic.twitter.com/AGprxFhktS
— BJP (@BJP4India) September 16, 2021
मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या 21 दिवसीय कार्यक्रमामध्ये 14 कोटी रेशनच्या पिशव्या, 5 कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत 71 जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, भाजपाकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला गती देण्याचं कामही या 21 दिवसात होईल.