मोदींचा हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचा डाव

By admin | Published: February 11, 2016 01:58 AM2016-02-11T01:58:34+5:302016-02-11T08:25:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारचा ज्या पद्धतीने वापर करतात त्यावरून उथळपणाच दिसून येतो, त्यांनी निवडणुकीत हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी रा.स्व.संघासोबत

Modi's breakthrough in Hindu-Muslim divide | मोदींचा हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचा डाव

मोदींचा हिंदू-मुस्लिमांत फूट पाडण्याचा डाव

Next

तिरुवनंतपूरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारचा ज्या पद्धतीने वापर करतात त्यावरून उथळपणाच दिसून येतो, त्यांनी निवडणुकीत हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी रा.स्व.संघासोबत विखारी प्रचार चालविला असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केरळ प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना केला.
मोदींकडे घडामोडी समजून घेण्याचा अभाव असून ते स्वत:च्या कल्पनांबाबत मीडियामध्ये मोठा उत्सव सुरू करतात. त्यांना तपशीलात जाण्याची गरज वाटत नाही. केवळ कार्यक्रम आणि समारंभांवर आधारित राजकारण करणे आवडते. नागा करार झाला त्यावेळी मोदींनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्याबाबत माहिती दिली, मात्र मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना त्याबाबत काहीही कळविले नाही.
गृहमंत्र्यांना काहीही माहिती नसते, असा कोणताही करार नाही हे आपल्याला लवकरच दिसून येते. काय सुरू आहे याची पंतप्रधानांनाही माहिती नसते. कुणीतरी मोदींना करार झाला म्हणून सांगतात ते काँग्रेस अध्यक्षांना करारावर स्वाक्षरी
झाली म्हणून सांगतात,असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

एकजुटीचे आवाहन...
विधानसभा निवडणुकीत सर्व मतभेद बाजूला सारत एकजुटीने लढण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी पक्षकार्यकर्त्यांना केले आहे. केरळच्या प्रदेश नेत्यांनी प. बंगालमध्ये माकपसोबत युती न करण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे. प.बंगालसोबतच केरळमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यासाठी माकपच्या नेत्यांनी काँग्रेसला युती करण्याचे आवाहन केले असले तरी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या मुद्यावर मतभिन्नता असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Modi's breakthrough in Hindu-Muslim divide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.