मोदींनी घेतलेला निर्णय अचूक, राहुल गांधींकडून मोदींचं कौतुक
By admin | Published: September 30, 2016 12:57 PM2016-09-30T12:57:52+5:302016-09-30T13:02:03+5:30
पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्व राजकीय पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक होत असताना आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मोदींची स्तुती केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्व राजकीय पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक होत असताना आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मोदींची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय अचूक असल्याचं सांगत राहुल गांधींनी पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन केलं.
'मी आणि माझा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत. त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय अचूक असून अडीच वर्षात मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाला शोभणारा निर्णय घेतला असल्याचं', राहुल गांधी बोलले आहेत.
भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर एकीकडे भारतामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना पाकिस्तानमध्ये मात्र तणाव आहे. भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडू कौतुक करत असताना पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. 'पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टींवर चर्चा केली जाऊ शकते त्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचं नुकसान होतं', असं ट्विट शाहिद अफ्रिदीने केलं आहे.
My party and I stand with PM Narendra Modi. What he has done is right: Congress VP Rahul Gandhi on #SurgicalStrike conducted by Indian army
— ANI (@ANI_news) September 30, 2016
उरी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने बुधवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.
#WATCH Rahul Gandhi: "I thank PM for taking this action. My party & I stand with him in this" on #SurgicalStrike conducted by Indian army pic.twitter.com/L7kSlg0lEk
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2016