मोदींची डिग्री खोटीच, दिल्ली विद्यापीठ दबावाखाली - आपचा नवा आरोप
By admin | Published: May 11, 2016 06:37 PM2016-05-11T18:37:49+5:302016-05-11T18:58:44+5:30
दिल्ली विद्यापीठानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बनावट मार्कशीट्सना अधिकृततेचा दर्जा दिल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - दिल्ली विद्यापीठानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बनावट मार्कशीट्सना अधिकृततेचा दर्जा दिल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. भाजपानं दाखवलेल्या मार्कशीट्स व आपल्याकडे असलेल्या मार्कशीट्स यांच्यामध्ये तफावत असून मोदींच्या पदव्या बनावट असल्याचा आरोप नव्यानं आपचे नेते आशुतोष यांनी केला आहे.
दोन प्रकारच्या मार्कशीट्स असून एकामध्ये नाव आणि विषय हातानं लिहिलेले आहेत, तर दुसऱ्या मार्कशीट्समध्ये ते हाताने लिहिलेले नाहीत असा आरोप आशितोष यांनी केला आहे. असं का असा प्रश्न विचारत त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे रजिस्ट्रार तरूण दास यांना लक्ष्य केले आहे.
तसेच आपच्या ताब्यात असलेल्या मार्कसीटमध्ये आणि भाजपानं दाखवलेल्या मार्कसीट्समध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या सह्यांमध्येही तफावत असल्याचा दावा आशुतोष यांनी केला आहे.
मोदींच्या मार्कशीट्स कम्प्युटरवर तयार करण्यात आल्या असल्याचा आरोप आशुतोष यांनी केला आहे. दिल्ली विद्यापीठाकडे 18975मध्ये कम्प्युटर होते का असा सवालही त्यांनी विचारला आहे. दिल्ली विद्यापीठाने दबावाखाली हा प्रकार केला असून नोकऱ्या वाचवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांना अधिकृत केल्याचा दावा आशुतोष यांनी केला आहे. हे प्रकरण आपण लावून धरणार असल्याचंही आशुतोष यांनी म्हटलं आहे.
चार दशकांपूर्वीचं रेकॉर्ड नाही - दिल्ली विद्यापीठ
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिल्ली विद्यापीठाने याच संदर्भात वेगळे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. गलगली यांनी सप्टेंबर 2015मध्ये नरेंद्र मोदींच्या डिग्रीसंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी विद्यापीठाने चार दशकांपूर्वीचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे गलगली यांना कळवले होते. गलगली यांनी यासंदर्भातली कागदपत्रे ट्विटरवर अपलोड केली आहेत.
तसेच, चार दशकापूर्वीचा रेकॉर्ड नसल्याचं उत्तर दिल्ली विद्यापीठाने आपल्याला दिलं होतं, मग आता डिग्री कुठून सापडली असा सवालही गलगली यांनी केला आहे.
Detail of my Sep 2015 RTI reply as receive from @DelhiUniv_DU
— ANIL GALGALI (@ANILGALGALIRTI) May 11, 2016
Also my complaint to VC & Registrar #PMDegreeProofpic.twitter.com/WoUHzhETjn
4 दशकाचा अभिलेख नाही मग कशी मिळाली मोदी यांची पदवी ? #मोदीचीपदवी#दिल्लीयूनिवर्सिटी@DelhiUniv_DU@narendramodihttps://t.co/0tNjR70N5i
— ANIL GALGALI (@ANILGALGALIRTI) May 11, 2016