मोदींची परीक्षा पाच राज्यांमध्ये

By admin | Published: March 5, 2016 04:29 AM2016-03-05T04:29:54+5:302016-03-05T04:29:54+5:30

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांत तसेच पुडुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला

Modi's examination in five states | मोदींची परीक्षा पाच राज्यांमध्ये

मोदींची परीक्षा पाच राज्यांमध्ये

Next

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांत तसेच पुडुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, तिथे ४ एप्रिल ते १६ मेपर्यंत विविध टप्प्यांमध्ये मतदान होईल. सर्व राज्यांतील मतमोजणी मात्र एकाच दिवशी, १९ मे रोजी होणार आहे. या निवडणुका म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामगिरीची परीक्षा असेल असे मानले जात आहे.
तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीमध्ये एकाच दिवशी, १६ मे रोजी मतदान होणार असून, पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत आणि आसाममध्ये दोन टप्प्यांत मतदान घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी जाहीर केले.
पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून, सहा टप्प्यांत मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये मतदान घेण्यात येईल. या भागांत ४ एप्रिल आणि ११ एप्रिलला मतदान होईल. या दोन्ही तारखांचा एकच टप्पा गणण्यात आला आहे. या भागांचे संवेदनशील स्वरूप व सुरक्षा दलांची उपलब्धता लक्षात घेऊनच या दोन वेगवेगळ्या तारखांचा पहिल्या टप्प्यात समावेश केला आहे. त्यानंतर १७, २१, २५, ३० एप्रिल आणि ५ मे रोजी पुढच्या टप्प्यातील मतदान पार पडेल. आसाममध्ये ४ एप्रिल आणि ११
एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होईल, असे झैदी म्हणाले.
विधानसभेच्या आसाममध्ये १२६, केरळमध्ये १४0, तामिळनाडूमध्ये २३४, पश्चिम बंगालमध्ये १९४ तर पुडुच्चेरीमध्ये अवघ्या ३० जागा आहेत.बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या पाच
राज्यांतील निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. मोदी यांची कसोटी लागणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केंद्रे ही शक्यतो खालच्याच मजल्यावर असावीत असे निर्देश दिले आहेत. (वृत्तसंस्था)
विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच नॅशनल स्कूल आॅफ डिझाईनने ‘नोटा’साठी (कोणत्याही उमेदवाराला मत न देणे) तयार केलेल्या चिन्हाचा वापर करण्यात येईल.
सर्व मतदान केंद्रांवर सात मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. फिरत्या पथकांना जीपीएस लावलेली वाहने पुरविली जातील आणि त्यांच्यासोबत केंद्रीय दलांचे जवान तैनात असतील, अशी माहिती झैदी यांनी दिली.
निमलष्करी दलांचे

80000
जवान राहणार तैनात
चार राज्ये आणि
पुडुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक काळात सुरक्षा प्रदान करण्यासाठी निमलष्करी दलांचे ७५ ते ८० हजार जवान तैनात करण्यात येतील.
‘निमलष्करी दलाच्या

750-800
कंपन्यांची मागणी करण्यात आली आहे. आम्ही ही मागणी पूर्ण करू,’ असे केंद्रीय गृहसचिव राजीव मेहरिषी यांनी पत्रकारांना सांगितले. निमलष्करी दलाच्या एका कंपनीत १०० जवानांचा समावेश असतो.
> महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र
ज्या स्थळांवर काही सामाजिक चालीरिती तसेच परंपरांमुळे महिलांना पुरुषांकडून मतदानामध्ये अडथळा होतो, अशा ठिकाणी आयोगाच्या मंजुरीने महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची स्थापना करता येईल. त्याचप्रमाणे मोठ्या गावांमध्ये दोन मतदान केंद्रे निर्माण करून त्यापैकी एक पुरुषांसाठी व एक महिलांसाठी ठेवता येईल. महिलांच्या मतदान केंद्रामधील कर्मचारीही महिलाच असतील अशी यामध्ये तरतूद आहे.
> उमेदवाराचे छायाचित्र
मतदारांना मतदान करणे सोयीचे जावे यासाठी ईव्हीएम यंत्र आणि पोस्टल मतपत्रिकेवर उमेदवारांचे छायाचित्र देणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. एकाच मतदारसंघात समान नावाच्या उमेदवारांमुळे होणारा गोंधळ यामुळे टाळता येईल.
> विधानसभा जागा
126
आसाम
140
केरळ194
प. बंगाल
234
तामिळनाडू

Web Title: Modi's examination in five states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.