काळा पैसा सफेद करण्यासाठी मोदींची फेअर अँड लव्हली योजना
By admin | Published: March 2, 2016 05:15 PM2016-03-02T17:15:25+5:302016-03-02T17:56:22+5:30
काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असे सांगत होते मात्र आता त्यांनाच वाचवण्यासाठी ते योजना घेऊन आले आहेत.काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला.
राहुल गांधी यांनी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेसह एकूण मोदींच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. निवडणुकीत मोदींनी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते पण कोणलाही रोजगार मिळालेला नाही. मनरेंगा इतकी वाईट योजना मी बघितलेली नाही असे नरेंद्र मोदी सांगतात पण अर्थमंत्री अरुण जेटली मला येऊन सांगतात मनरेगा इतकी चांगली योजना नाही. मग हीच बाब ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.
पंतप्रधानांनी आमचे ऐकावे, आम्ही त्यांचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा व्देष करत नाही असे राहुल म्हणाले. मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्यावेळी मोदींना मुंबईत जाऊ नका अशी भारत सरकारने विनंती केली होती. मात्र त्यांनी आमचे ऐकले का ? मोदी मुंबईत गेले आणि त्यामुळे कारवाईत अडथळे आले असा आरोप राहुल यांनी केला.
मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी नागा करारावर स्वाक्षरी केली त्याची गृहमंत्र्यांनाही माहिती नव्हती असे राहुल म्हणाले. भाषणाच्या आघोत राहुल गांधी गांधींजी आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय ? असे विधान केले. राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निशाण्यावर होते. आता मोदी त्यांना काय उत्तर देतात याची उत्सुक्ता आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे
अरुण जेटली मला भेटले आणि सांगितले मनरेगा इतकी दुसरी कोणतीही चांगली योजना नाही, मग हेच ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ?
मेक इन इंडिया सुरु केले पण किती लोकांना रोजगार मिळाला
काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असल्याचे ते सांगत होते मात्र आता त्यांना वाचवण्याची योजना ते घेऊन आले आहेत
निवडणुकीपूर्वी मोदी म्हणत होते डाळ ७० रुपये किलो आहे, किंमती कमी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते पण आता डाळीची किंमत प्रतिकिलो २०० आहे
पाकिस्तानने मुबई हल्ला केला आणि आपल्या पंतप्रधानांनी काय केलं ? कोणताही विचार न करता पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चहा प्यायला गेले
जेव्हा मुंबई हल्ला झाला सरकारने नरेंद्र मोदींना मुंबई दौरा न करण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकल नाही
ध्वजाचा आदर म्हणजे प्रत्येक मताचा आदर करणे
पंतप्रधान कुणाचा सल्ला ऐकतात, कोणाच्या मताचा आदर करतात
हा देश म्हणजे पंतप्रधान नाही आणि पंतप्रधान म्हणजे हा देश नाही
न्यायालयात प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मारले तेव्हा पंतप्रधान गप्प का बसले ?
तुम्ही जेएनयू आणि गरीबांना चिरडू शकत नाही
गांधीची आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय
काळा पैसा सफेद करण्यासाठी सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे
Main RSS wala nahi hoon,mujhse ghaltiyaan hoti hain-Rahul Gandhi in LS pic.twitter.com/Eqf5gRxKFC
— ANI (@ANI_news) March 2, 2016