'अमेरिकेत नेहरुंचे कौतुक होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:48 PM2019-09-23T15:48:54+5:302019-09-23T15:49:33+5:30
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी मुंबई दौऱ्यावर असताना नेहरुंवर टीका केली होती. कलम 370 वरून त्यांनी नेहरुंना लक्ष्य केले होते. परंतु, अमेरिकेत मोदीच्या कार्यक्रमात एका अमेरिकन नेत्याने नेहरुंवर स्तुतीसुमणे उधळल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे माध्यमांमध्ये नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. मात्र मोदींना आणि भाजपला न रुचणारी घटना अमेरिकेतील हाउडी मोदी कार्यक्रमात घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये भाजप आघाडीवर असते. मात्र अमेरिकेतील सभागृह नेत्याने मोदींसमोरच नेहरुंचे कौतुक केले. त्यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी मुंबई दौऱ्यावर असताना नेहरुंवर टीका केली होती. कलम 370 वरून त्यांनी नेहरुंना लक्ष्य केले होते. परंतु, अमेरिकेत मोदीच्या कार्यक्रमात एका अमेरिकन नेत्याने नेहरुंवर स्तुतीसुमणे उधळल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी काँग्रेस नेते स्टेनी हॉयर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. हायर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींसमोर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचे कौतुक केलं. नेहरू आणि गांधी यांची शिकवण आजही महत्त्वपूर्ण असून दोन्ही देश त्यांच्याच विचारांवर चालतात, असे हायर यांनी म्हटले.
यावर काँग्रेसनेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिल्या. रमेश म्हणाले की, नेहरूजींच्या योगदानाची अमेरिकेने मोदींना आठवण करून दिली याचा आपल्याला आनंद आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, कधी काळी लालकृष्ण अडवाणी यांनी न्यूयॉर्क येथे दिलेल्या भाषणात नेहरुंच्या कार्याचा गौरव केला होता. वाजपेयी यांनी देखील नेहरू संदर्भात गौरवोद्गार काढले होते.
मोदीजी के लिए ये बिल्कुल अप्रत्याशित था। नेहरू जी और गांधी जी की उपलब्धियों का जिक्र होते समय उनके हाव-भाव देखने लायक थे।#HowdyModihttps://t.co/lrPKQZZVRb
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) September 23, 2019
या व्यतिरिक्त अभिषेक मनू सिंघवी यांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली. अमेरिकेत नेहरुजीचं कौतुक होणे ही मोदींसाठी अनपेक्षित बाब होती. नेहरू आणि महात्मा गांधी यांचा गौरव होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते, असंही सिंघवी म्हणाले.