सहा वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य मोदींच्या हाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:58 AM2018-02-09T03:58:13+5:302018-02-09T03:58:27+5:30
राज्यसभेतील ५५ सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यामध्ये संपत असून, त्यात अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेतील ५५ सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यामध्ये संपत असून, त्यात अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांचे भवितव्य पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती आहे. सचिन तेंडुलकर, जया बच्चन, रेखा, चिरंजीवी, हे नामवंतही एप्रिलमध्ये निवृत्त होत असून, महाराष्ट्रातील वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील, राजीव शुक्ला (काँग्रेस), अजय संचेती (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना) यांचाही त्यात समावेश आहे.
केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचीही मुदत संपत आहे. भाजपाला राज्यसभेमध्ये बहुमत नसल्याने अनेकदा पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागते. भाजपाला महत्त्वाची वाटणारी विधेयके लोकसभेमध्ये मंजूर होऊनही ती राज्यसभेत विरोधकांकडून अडविली जात असल्याने मोदी सरकारच्या अडचणींत भर पडली आहे. त्यामुळे अशा विधेयकांचे काही वेळा वटहुकूम काढावे लागतात.
शिवसेनेचे अनिल देसाई
यांची मुदत २ एप्रिल संपत आहे. सपाचे नरेश अग्रवाल, भाजपाचे वादग्रस्त नेते विनय कटियार, सत्यव्रत चतुर्वेदी, प्रमोद तिवारी हे सदस्यही एप्रिलमध्ये निवृत्त होतील. राज्यसभा नियुक्त अभिनेत्री रेखा, सचिन तेंडुलकर व अनु आगा यांचीही मुदत संपणार आहे.
>भाजपासाठी बिकट वाट : आंध्रातील तेलगू देसम भाजपावर नाराज आहे. त्याची राज्यसभा निवडणुकीत भाजपाला कितपत साथ मिळेल याविषयी शंका आहे. भाजपाला सर्वांत मोठे आव्हान आहे बिहारमध्ये. त्या राज्यात जनता दल (यू)व भाजपा यांचे सरकार असले तरी राज्यसभा निवडणुकीत नितीश कुमार भाजपाला मदत करतील का, असा प्रश्न आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांवर भाजपाची मदार असेल. तेथून कुमक व पाठबळ मिळेल याची भाजपाला खात्री आहे. काँग्रेस, बसपा, सपा, तृणमूल काँग्रेस, तेलगु देसम पक्ष हे आपल्या जागा कमी होणार नाहीत यासाठी प्रयत्न करतील. त्यांचे हे प्रयत्न भाजपाच्या मिशन राज्यसभाच्या मार्गात अडचणी निर्माण करू शकते.
>५५ खासदारांची नावे, पक्ष, राज्य व निवृत्ती
खासदाराचे नाव पक्ष राज्य
नरेश अग्रवाल सपा उत्तर प्रदेश
मुनकद अली बसपा उत्तर प्रदेश
जया बच्चन सपा उत्तर प्रदेश
विनय कटियार भाजपा उत्तर प्रदेश
किरणमय नंदा सपा उत्तर प्रदेश
दर्शनसिंह यादव सपा उत्तर प्रदेश
आलोक तिवारी सपा उत्तर प्रदेश
प्रमोद तिवारी काँग्रेस उत्तर प्रदेश
चौ. मुनव्वर सलीम सपा उत्तर प्रदेश
वंदना चव्हाण राष्ट्रवादी महाराष्ट्र
अनिल देसाई शिवसेना महाराष्ट्र
रजनी पाटील काँग्रेस महाराष्ट्र
अजय संचेती भाजपा महाराष्ट्र
राजीव शुक्ला काँग्रेस महाराष्ट्र
डी. पी. त्रिपाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र
एल. गणेशन भाजपा मध्य प्रदेश
थावरचंद गहलोत भाजपा मध्य प्रदेश
मेघराज जैन भाजपा मध्य प्रदेश
सत्यव्रत चतुर्वेदी काँग्रेस मध्य प्रदेश
कुणालकुमार घोष तृणमूल पश्चिम बंगाल
विवेक गुप्ता तृणमूल पश्चिम बंगाल
मोहम्मद नदीमुल हक तृणमूल पश्चिम बंगाल
तपनकुमार सेन भाकप पश्चिम बंगाल
प्रकाश जावडेकर भाजपा मध्य प्रदेश
देवेंद्र गौड टी. टीडीपी आंध्र प्रदेश
डॉ. के. चिरंजीवी काँग्रेस आंध्र प्रदेश
रेणुका चौधरी काँग्रेस आंध्र प्रदेश
>खासदाराचे नाव पक्ष राज्य
राजीव चंद्रशेखर अपक्ष कर्नाटक
बसवराज पाटील भाजपा कर्नाटक
रामकृष्ण रंगासाइ भाजपा कर्नाटक
के. रहमान खान काँग्रेस कर्नाटक
शंकरभाई एन. वेगड भाजपा गुजरात
अरुण जेटली भाजपा गुजरात
मनसुखलाल मांडविया भाजपा गुजरात
पुरुषोत्तम रुपाला भाजपा गुजरात
डॉ. महेंद्र प्रसाद जद (यू) बिहार
धर्मेंद्र प्रधान भाजपा बिहार
रविशंकर प्रसाद भाजपा बिहार
डॉ. अनिलकुमार साहनी जद (यू) बिहार
वशिष्ठ नारायण सिंह जद (यू) बिहार
नरेंद्र बुढानिया काँग्रेस राजस्थान
डॉ. अभिषेक मनु संघवी काँग्रेस राजस्थान
भूपेंदर यादव भाजपा राजस्थान
ए. यू. सिंह देव बिजद ओदिशा
ए. व्ही. स्वामी अपक्ष ओडिशा
दिलीपकुमार टिकी बिजद ओडिशा
सी. एम. रमेश टीडीपी तेलंगणा
आनंदभास्कर रापोलू काँग्रेस तेलंगणा
डॉ. भूषणलाल जांगडे भाजपा छत्तीसगढ
महेंद्रसिंह महरा काँग्रेस उत्तराखंड
जगतप्रसाद नड्डा भाजपा हिमाचल
शादीलाल बत्रा काँग्रेस हरियाणा
अनू आगा नामनियुक्त
रेखा गणेशन नामनियुक्त
सचिन तेंडुलकर नामनियुक्त