जेटलींच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाप

By admin | Published: March 1, 2015 03:00 AM2015-03-01T03:00:04+5:302015-03-01T03:00:04+5:30

अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. मोदींनी वर्षभर जाहीर केलेल्या योजना जेटलींच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत झालेल्या आहेत.

Modi's imprint on Jaitley's budget | जेटलींच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाप

जेटलींच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाप

Next

पंतप्रधानांच्या नावे सहा नव्या योजना : योग करमुक्त केल्यानंतर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. मोदींनी वर्षभर जाहीर केलेल्या योजना जेटलींच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत झालेल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान, योगाचा प्रचार, गंगा शुद्धीकरण किंवा सहा कोटी शौचालये बांधण्याची योजना असो; मोदींच्या या सर्व मिशनला १०० टक्के करसवलत मिळाली आहे. त्यासोबतच कंपन्यांकडून सीएसआरच्या रूपात २ टक्के अतिरिक्त निधीही प्राप्त होणार आहे.
जेटली यांनी आपल्या २८ पृष्ठांच्या आणि ९० मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मोदींचा नामोल्लेख टाळला असला आणि योजनांना थेट मोदींचे नाव देण्याचे टाळले असले तरी पंतप्रधानांच्या नावाने अनेक योजनांचा शुभारंभ केला आहे. त्यात पंतपधान मुद्रा योजना, पंतप्रधान सुरक्षा (अपघात) विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे.
जेटली यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर सुरू केलेल्या ‘अटल नवनिर्माण मिशन’ या योजनेवरही मोदींचीच छाप आहे. तसेच दिवंगत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनाही सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्कील इंडिया या योजनांच्या माध्यमातून शासनात जनतेला सहभागी करून घेण्याची मोदींची दृष्टी आहे. परंतु जेटलींनी योगाला करमुक्त केल्यानंतर मोदींनीही या घोषणेचे बाके वाजवून
स्वागत केले. त्या वेळी जेटलींच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.

दिवसातून दोनदा मोदींची भेट
च्अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत जेटलींनी मोदींशी सातत्याने चर्चा केली. दिवसातून दोनदा ते मोदींना भेटत होते. विविध मुद्द्यांवर मोदींशी चर्चा करणे आवश्यक होते, असे जेटलींनी स्पष्ट केले.
च्अर्थमंत्रालयातील काही अधिकारीही मुद्दे निकाली काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये जेटलींनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्रालयातील अरविंद मायाराम, राजीव टकरु आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटविण्यात आले होते. या सर्वांची नियुक्ती तत्कालीन संपुआ सरकारने केली होती.

कवी जेटली
म्हणतात...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कवितेच्या दोन ओळींनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करत शेरेबाजी करण्याची संधी सोडली नाही.
कुछ तो फुल खिलाए हमने,
और कुछ फुल खिलाने है,
मुश्किल यह है, बाग में अबतक
कांटे कई पुराने है...
असे यापूर्वीच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उद्देशून जेटली यांनी या कवितेचा आधार घेतला.
हमे मायूसी का माहोल मिला था
यह बदला हुआ आर्थिक माहोल है.

Web Title: Modi's imprint on Jaitley's budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.