पंतप्रधान मोदींचा महिन्याभरातील तिसरा गुजरात दौरा, करोडो रूपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 11:11 AM2017-10-07T11:11:19+5:302017-10-07T11:23:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे महिन्याभरातील मोदींचा हा तिसरा गुजरात दौरा आहे. शनिवारी सकाळी मोदी जामनगरला पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वडनगरबरोबरच द्वारका, गांधीनगर आणि भरूचमध्येही जाणार आहेत. तेथे अनेक नविन प्रकल्पाची सुरूवात मोदी करणार आहेत. गुजरात निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिनाभरातील तिसरा गुजरात दौरा तसंच नविन प्रकल्पाची सुरूवात या मुद्द्यावरून काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Gujarat: PM Narendra Modi arrives in Dwarka. He will visit Dwarkadhish Temple later. pic.twitter.com/XAoxGPQRaP
— ANI (@ANI) October 7, 2017
महिन्याभरातील नरेंद्र मोदींचा हा तिसरा गुजरात दौरा होता. 14 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचं उद्धाटन केलं. यानंतर 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसात्या निमित्ताने मोदी गुजरातमध्ये होते. त्यावेळी त्यानी सरदार सरोबर धरणाचं उद्धाटन केलं तसंच एका रॅलीला संबोधित केलं. यानंतर तीन आठवड्यानंतर पंतप्रधान मोदी आज पुन्हा गुजरातला गेले आहे. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्या दरम्यान मोदी प्रकल्पांच्या उद्धाटनासह एका रॅलीला पण संबोधीत करणार आहेत.
Gujarat: PM Narendra Modi offers prayers at Dwarkadhish Temple in Dwarka. pic.twitter.com/mq1cJNGl0d
— ANI (@ANI) October 7, 2017
सुत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून कमीतकमी एक वेळा गुजरातमध्ये येतील. गुजरात निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी गुजरातमध्ये नव्या प्रकल्पांची सुरूवात मोदींकडून केली जाणार आहे. मोदींच्या या तिसऱ्या दौऱ्यावर विरोधकांकडून मात्र टीका केली जाते आहे.
Gujarat: PM Narendra Modi at Dwarkadhish Temple in Dwarka; will lay foundation stone of bridge between Okha & Bet Dwarka, later. pic.twitter.com/AezIRP7lFf
— ANI (@ANI) October 7, 2017
असा असेल मोदींचा गुजरात दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारकापासून दौऱ्याची सुरूवात करतील. द्वारकाधीस मंदिरात जाऊन मोदी प्रार्थना करणार आहेत. त्यानंतर चोटिला, गांधीनगर, वडनगर आणि भरूचला जातील.
- ओखा को बेटाला द्वारकाशी जोडणाऱ्या एका चार पदरी पुलाच्या प्रकल्पाचं उद्धाटन केलं जाणार आहे. या पुलासाठी जवळपास 962 कोटी खर्च अपेक्षित आहे. यानंतर मोदींची सभा होणार आहे.
- यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकोटपासून 27 किमी अंतरावर असणाऱ्या हिरासरमध्ये जातील. तेथे विमानतळाच्या प्रकल्पाचं उद्धाटन होणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून तयार केला जाणार आहे. त्यासाठी जवळपास 1405 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसंच 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- अहमदाबाद-राजकोट सहापदरी हायवे आणि राजकोट-मोरबी चौपदरी हायवेच्या प्रकल्पाचं उद्धाटन होणार आहे.
- पंतप्रधान मोदी सुरेंद्रनगरमधील सुरसागर डेअरीमध्ये ऑटोमॅटीक मिल्क प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग प्रकल्पाचं उद्धाटन करतील. तसंच शहारीत 4 झोनमध्ये नियमित पाण्याची पूर्तता करण्यासाठी पाईपलाईनचीसुद्धा सुरूवात करणार आहेत.
- मोदी गांधीनगरमधील पलज गावात जाणार आहे. तेथे 397 एकरमध्ये पसरलेल्या अत्याधुनिक आयआयटी कॉम्पेक्सचं लोकार्पण करणार आहेत. केंद्राच्या पहिल्या डिजिटल इंडिया अंतर्गत येणाऱ्या या संस्थेतून ग्रामीण भागातील सहा करोड लोकांना डिजिटल शिक्षण देण्याची योजना आहे. इथेही मोदी जनसमुदायाला संबोधित करणार आहेत.
- दुसऱ्या दिवशी मोदी त्याचं जन्मगाव वडनगरला जाणार आहेत. पंतप्रधान पदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदी पहिल्यांदाच वडगावला जाणार आहेत.तेथे मोदी एका मेडिकल कॉलेजचं लोकार्पण करतील तसंच हिम्मतनगरमधील एका हॉस्पिटलचं उद्धाटन करणार आहेत.
- हिम्मतनगरनंतर मोदी भरूचमध्ये जाणार आहेत. तेथे नर्मदा नदीवर तयार होणाऱ्या धरण प्रकल्पाचं उद्घाटन करतील. त्यानंतर मोदी नर्मदा व्हॅली फर्टिलायझर अॅण्ड केमिकल्समधील 600 करोडच्या प्रकल्पाची सुरूवात करणार आहेत. यानंतर सूरतपासून बिहारच्या जयनगरपर्यंत जाणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसला मोदींकडून हिरवा झेंडा दाखविला जाणरा आहे.