मोदींची जादू, अमेरिकेतील पाच तरुण हिंदी शिकण्यासाठी भारतात
By admin | Published: July 20, 2015 03:19 PM2015-07-20T15:19:18+5:302015-07-20T15:35:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशवारीमुळे परदेशातील तरुणांनाही आता हिंदीची भूरळ पडली असून हिदी भाषा शिकण्यासाठी अमेरिकेतील पाच विद्यार्थी थेट भारतात दाखल झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशवारीमुळे परदेशातील तरुणांनाही आता हिंदीची भूरळ पडली असून हिदी भाषा शिकण्यासाठी अमेरिकेतील पाच विद्यार्थी थेट भारतात दाखल झाले आहे. मोदींनी आम्हाला निरोगी राहण्याचा मार्ग दाखवला. आता आम्हालाही भारतीय संस्कृती व हिंदी भाषा जाणून घ्यायची उत्सुकता आहे असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हे नेहमीच चर्चेचे विषय ठरले असून भारतीय पेहेरावात अनिवासी भारतीयांशी हिंदीत संवाद साधण्याची मोदींची शैली अनेकांना भावते. पण आता मोदींच्या या शैलीची जादू परदेशी विद्यार्थ्यांवरही चालली आहे. अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये शिकणारे पाच विद्यार्थी सध्या इंदौरमध्ये आले आहे. भारतीय संस्कृती, हिंदी भाषेचा अभ्यास करण्यासाठी हे विद्यार्थी भारतात आले असून १० महिन्यांसाठी ते भारतातच राहणार आहेत. विशेष म्हणजे भारतात येण्याचे श्रेय या विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींना दिले आहे. मोदी हे भारताचे सर्वात सक्षम पंतप्रधान असून त्यांच्यामुळेच आम्हाला हिंदी भाषेविषयी उत्सुकता वाटू लागली असे लॉरेनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.