सार्वजनिक क्षेत्रातील ४५ उद्योगांना मोदींचा इशारा
By admin | Published: March 1, 2017 04:27 AM2017-03-01T04:27:28+5:302017-03-01T04:27:28+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या ४५ उपक्रमांना मोदी सरकारने अंतिम इशारा दिला आहे.
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- एअर इंडिया, भारतीय पर्यटन विकास महामंडळासह सार्वजनिक क्षेत्रातील प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या ४५ उपक्रमांना मोदी सरकारने अंतिम इशारा दिला आहे. एक तर कामगिरी सुधारा अन्यथा निरोप घ्या. पंतप्रधान कार्यालयातील व निती आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उद्योगांना वर्षांमागून वर्षे दरवर्षी होत असलेला एक लाख कोटीेंचा तोटा खाली आणण्याचा निर्धार मोदींनी केला आहे.
प्रस्तावांपैकी एक हा एअर इंडियाला व्यावसायिक भागीदार शोधण्यासाठी वेगाने काम करीत आहे. एअर इंडियाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची मदत दिल्यानंतरही काही उपयोग झालेला नाही. मोदी यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्यासोबत नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. करदात्यांचा पैसा सरकार आणखी वाया घालवणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट करून परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी तीन महिने मुदत दिली. हॉटेल व्यवसायाशी सरकारला काही देणेघेणे नाही, हॉटेल व्यवसायातून सरकारने बाहेर पडलेच पाहिजे अशा निष्कर्षाला निती आयोग आला आहे. अपवाद फक्त दिल्लीतील ल्युटेन्समधील अशोक हॉटेलचा. गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांचे कार्यालय आणि अर्थमंत्रालयाला तज्ज्ञांनी अनेकवेळा सादरीकरण केल्याचे समजते.
>आयोगाने दिली यादी
सार्वजनिक क्षेत्रातील आजारी असलेल्या ७४ कंपन्यांची यादी निती आयोगाने सोपविली. यात २६ कंपन्या बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. शिवाय दोन कंपन्या आहे तशा ठेवाव्यात,
दहा कंपन्यांत धोरणात्मक निर्गंुतवणूक करावी, २२ कंपन्यांचे पुनरुज्जीवन करावे. यात धोरणात्मक निर्गंुतवणुकीचा पर्याय आयोगाने दिला आहे.